पाच लाख रुपयांच्या वसुलीसाठी तरुणीचा बलात्काराचा बनाव; आरोपी महिलेसह तीन वकिलांना अटक

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल करून तरुणाकडून पाच लाख रुपये वसूल केले, त्यात तीन वकिलांनी तिला मदत केली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि तीन आरोपींना अटक केल आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी अटक केलेल्यांकडून पैसेही जप्त केले आहेत.

 Alleging rape, the girl took Rs 5 lakh from the youth
बलात्काराचा आरोप करत तरुणीने तरुणाकडून उकाळले 5 लाख रुपये  |  फोटो सौजन्य: Times Now

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल करून तरुणाकडून पाच लाख रुपये वसूल केले, त्यात तीन वकिलांनी तिला मदत केली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि तीन आरोपींना अटक केल आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी अटक केलेल्यांकडून पैसेही जप्त केले आहेत.

शहर पोलिस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, तरुणीच्या आरोपावरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध हरिपरवट पोलीस ठाण्यात बलात्कार आणि धमकावणे यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.  कुमार म्हणाले की, तपासात आरोप खोटे असल्याचे आढळून आले असून त्यात काही वकीलही सहभागी आहेत. वकिलांच्या मदतीने तरुणीने पाच लाख रुपयेही वसूल केल्याचे त्यांनी सांगितले. 

मंगळवारी पोलिसांनी महिला आरोपी अंजली, जितेंद्र राजपूत, निशांत कुमार आणि शेखर प्रताप या तीन वकिलांना अटक केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्याकडून 3.75 लाख रुपये जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी