Nude Video Call Blackmail : तरुणीने केला व्हिडीओ कॉल, कपडे काढायला केली सुरूवात आणि त्यानंतर झाले ते होते धक्कादायक

Nude Video Call Blackmail बिहार मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या मोबाईल एका तरुणीचा व्हिडीओ कॉल आला. तरुण काही बोलणार तेवढ्यात समोरच्या मुलीने कपडे काढण्यास सुरूवात केली नंतर तरुणाने कसाबसा फोन ठेवला परंतु त्यानंतर तरुणाला धमकी येण्यास सुरूवात झाली. या प्रकारामुळे तरुण घाबरून गेला होता

nude video call
न्युड व्हिडीओ कॉल 
थोडं पण कामाचं
  • बिहार मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • तरुणाच्या मोबाईल एका तरुणीचा व्हिडीओ कॉल आला.
  • समोरच्या मुलीने कपडे काढण्यास सुरूवात केली

Nude Video Call Blackmail :पाटणा : बिहार मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या मोबाईल एका तरुणीचा व्हिडीओ कॉल आला. तरुण काही बोलणार तेवढ्यात समोरच्या मुलीने कपडे काढण्यास सुरूवात केली नंतर तरुणाने कसाबसा फोन ठेवला परंतु त्यानंतर तरुणाला धमकी येण्यास सुरूवात झाली. या प्रकारामुळे तरुण घाबरून गेला होता. (girl make nude video call guy and start blackmailing bihar)
याबाबत सविस्तर वृत्त असे असे की, बिहारची राजधानी पाटण्यात एका तरुणाला एका तरुणीचा फोन आला. तरुण विमा विकणारा एजंट होता, म्हणून तरुणीने त्याच्याकडून त्याचा व्हॉट्सऍप नंबर घेतला. आपला आणि अपाल्या कुटुंबीयांचा विमा काढायचा आहे, त्यामुळे लवकरच फोन करेन अस तरुणीने तरुणाला सांगितले. 
नंतर त्याच रात्री तरुणीचा तरुणाला व्हिडीओ कॉल आला. सुरुवातीला बोलून झाल्यानंतर काहीवेळातच तरुणीने व्हिडीओ कॉलवर कपडे काढण्यास सुरूवात केली तसेच तरुणीशी अश्लील संभाषणही सुरू केले. तरुणाला अतिशय अवघडल्यासारखे झाल्याने त्याने फोन कट केला. परंतु त्याला माहित नव्हते की आता त्याच्याबरोबर काय होणार आहे. 
अचानक तरुणाच्या मोबाईल फोटो, स्क्रीनशॉट्स आणि व्हिडीओ क्लिप्स आल्या होत्या. त्यात ती नग्न तरुणी आणि तिच्यासोबत बोलतानाचा तरुणाचा फोटो आणि व्हिडीओ होते. तरुणीने सरळसरळ तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. माझ्या खात्यावर लगेच ५० हजार रुपये पाठव नाहीतर हे फोटो व्हायरल करेन अशी धमकी तिने दिली. त्यावर तरुणाने तिला पैसे पाठवण्यास नकार दिला. 
त्यानंतर मुलीसोबत असलेल्या सह आरोपींनी तरुणाला फोन केला, तसेच आम्ही सायबरसेलमधून फोन करत असून तुझ्यावर कारवाई होईल अशी धमकी दिली. तसे नको असेल तर पैसे पाठवण्यासाठी त्यांनी तरुणाला सांगितले. त्यानंतरही तरुणाने पैसे पाठवले नाही. तरुणी आणि तिच्या गँगने मिळून तरुणाला ५० वेळा फोन केला आणि धमकी दिली तसेच पैसे उकळण्याचाही प्रयत्न केला. अखेर तरुणाने सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार केली.  पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. बिहारमधील ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेक जणांना गंडा घालून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी