Rape in hotel : नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले हॉटेलमध्ये, मग केला बलात्कार

नोकरीच्या मुलाखतीसाठी हॉटेलमध्ये बोलावून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये घडली आहे.

Rape in hotel
नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून तरुणीवर बलात्कार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तरुणीला हॉटेलमध्ये मुलाखतीसाठी बोलावले
  • संधी साधून केला बलात्कार
  • पोलीस घेतायत आरोपीचा शोध

Rape in hotel : नोकरीची मुलाखत देण्यासाठी (Job Interview) बोलावून एका तरुणीवर बलात्कार (Rape on girl) करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे. दिल्लीजवळ असणाऱ्या नोएडा (Noida) परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने तरुणीला जबर धक्का बसला असून तिने पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार नोंदवली आहे. नोकरीसाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती या तरुणीला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे आपल्यालाही नोकरी मिळेल, या आशेने तरुणी मुलाखतीसाठी हॉटेलमध्ये पोहोचली. मात्र तिथे जे घडलं ते पाहून तरुणीला जबर धक्का बसला. 

हॉटेलमध्ये पोहोचली तरुणी

तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार नोएडातील सेक्टर 27 मधील एका हॉटेलात तिला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. सागर नावाच्या तरुणाने तिच्याशी संपर्क साधून तिला हॉटेलच्या पत्त्यावर येण्यास सांगितलं होतं. त्यानुसार तरुणी स्वतःची शैक्षणिक कागदपत्रं आणि बायोडेटा घेऊन हॉटेलवर मुलाखतीसाठी पोहोचली. थोड्याच वेळात आपली मुलाखत होईल आणि आपल्याला नोकरी मिळणार की नाही, याचा फैसला होईल, या आशेवर ही तरुणी होती.

हॉटेल रुमवर अत्याचार

थोड्याच वेळात तरुणीला हॉटेलमधील एका रुमवर बोलावण्यात आलं. तिथं उपस्थित असलेल्या तरुणानं तिच्याशी बोलण्याच्या  बहाण्याने तिच्याशी लगट करायला सुरुवात केली. या प्रकाराने ध्कका बसलेल्या तरुणीने त्याला विरोध कऱण्याचा प्रयत्न केला. त्यावर तरुणीला जबर मारहाण करण्यात आली. तिच्या लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर नाहक बदनामी होईल, अशी तंबी देऊन तो तरुण तिथून पळून गेला. 

अधिक वाचा - Ayman al-Zawahiri: शेवटच्या क्षणी काय करत अल-जवाहिरी?, अमेरिकन अधिकाऱ्यानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम

बहिणीला सांगितली व्यथा

या घटनेने जबर मानसिक धक्का बसलेली तरूणी घरी आली आणि तिच्या बहिणीला तिने घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर बहिणीने दिलेल्या सल्ल्यानुसार तिने पोलिसांत याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेतली आणि तिला तातडीने मेडिकलसाठी पाठवून दिलं. 

अधिक वाचा - National Herald Case : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ED चा छापा, सोनिया-राहुल गांधी यांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी या प्रकऱणी तपासाला सुरुवात केली असून त्या तरुणाबाबतची काही प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या तरुणाने आपलं नाव सागर असल्याचं तरुणीला सांगितलं होतं. मात्र ते त्याचं खरं नाव नसून शाहबाज असं नाव असल्याचं समोर येत आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत. लवकरच आरोपीला अटक करून गजाआड केलं जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

अधिक वाचा - Car under Plane : अचानक Indigo च्या विमानाखाली आली कार, थोडक्यात टळला मोठा अपघात, पाहा VIDEO

फसव्या जाहीरातींपासून सावधान

आजकाल मुलाखतीच्या बहाण्याने किंवा इतर कुठल्याही फसव्या जाहीराती देऊन गरजू तरुण तरुणींचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा जाहीरातींना भुलून न जाता सर्व बाबींची खातरजमा करूनच तिथे जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. जर असे प्रकार कुणाबाबत घडले असतील, तर तातडीने त्याची तक्रार करण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. जेणेकरून आरोपींना गजाआड केलं जाईल आणि इतर कुणावर अत्याचार होण्यापासून वाचवता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी