Shocking! तरुणीने केला तरुणीवर बलात्कार; VIDEO शूट केला आणि मग...

Crime news Marathi: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. त्यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तरुणीनेच केला तरुणीवर बलात्कार, घटनेने खळबळ
  • सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवत तरुणींची फसवणूक
  • तरुणींसोबत गैरकृत्य करत व्हिडिओ केला शूट

नवी दिल्ली : एका मुलीने दुसऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur) येथे ही घटना घडली आहे. आरोपी तरुणीने पीडित अल्पवयीन मुलीला सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवत ग्वाल्हेर येथे नेलं. त्यानंतर तेथे तिला 10 दिवस बंधक बनवून ठेवलं आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. (Girl raped on minor girl in Gorakhpur Uttar Pradesh)

गोरखपूर येथे राहणारी पीडित मुलगी ही 10वी पास आहे. तर आरोपी मुलगी ही ग्वाल्हेरमध्ये राहणारी आहे. पीडित मुलीने सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी तिची ओळख आरोपी मुलीसोबत फेसबूकवर झाली होती. त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. हळूहळू दोघांमध्ये बोलणं, चर्चा वाढू लागली. 

त्याच दरम्यान आरोपी फेसबूक फ्रेंडने पीडित मुलीला पैसे आणि श्रीमंत बनण्याचं स्वप्न दाखवत सिनेमात काम करण्याचं आमिष दाखवलं. सिनेमात काम मिळणार आणि आपल्याला झटपट प्रसिद्धी, पैसा मिळणार या लालचेपोटी आरोपी तरुणीच्या जाळ्यात अडकली. 

ज्यावेळी पीडित तरुणी ग्वाल्हेर येथे पोहोचली तेव्हा तिला कळालं की फेसबूक फ्रेंड असलेली आपली मैत्रीण ही एक गँग चालवते आणि अल्पवयीन मुलींना सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवत त्यांच्यासोबत गैरकृत्य करते. इतकेच नाही तर पैशांसाठी ती या अल्पवयीन मुलींकडून अनेक अवैध कामे करून घेते.

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी असलेली मैत्रीण तिला अनेक मैत्रिणींकडे पाठवत होती. एकेदिवशी मैत्रिणीकडे पाठवले असताना संधीचा फायदा घेत तिने पळून जाण्यात यश मिळवलं. त्यानंतर तिने आपल्या मावशीला फोन करुन आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. 
या प्रकरणी गोरखपूर येथील पिपराइच पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आजीने तक्रारी दरम्यान दोन मोबाइल नंबर दिले होते, जे ट्रॅकिंगवर टाकले. त्यानंतर या क्रमांकाचे लोकेशन ट्रेस झाल्यावर ग्वाल्हेर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी तरुणीला अटक केली.

हे पण वाचा : नागपुरात फडणवीसांच्या होर्डिंगमधून अमित शहा गायब

या प्रकरणी पोलिसांनी 21 जून रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेची सुटका करुन पोलिसांनी तिची रवानगी बाल कल्याण समितीकडे केली आहे. ग्वाल्हेरच्या नागरिकांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी महिला ही आपलं जेंडर लपवून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवते. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करते आणि मग व्हिडिओ बनवते. या व्हिडिओच्या सहाय्याने ती मग मुलींकडून पैशांची मागणी करु लागते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी