Murder of Lover : विवाहित तरुणाच्या जाळ्यात फसली अल्पवयीन मुलगी, प्रियकरानेच लटकावले फासावर

आपले लग्न झाल्याचे लपवून इकबालने तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर काही दिवसांनी तिचा मृतदेह फासावर लटकल्याचे नातेवाईकांना दिसले.

Murder of Lover
विवाहित प्रियकराने तरुणीला लटकावले फासावर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विवाहित प्रियकराशी केले लग्न
  • तरुणीची झाली फसवणूक
  • प्रियकराने खून करून लटकावले फासावर

Murder of Lover : विवाहित तरुणाने (Married man) एका अल्पवयीन तरुणीला (Minor girl) आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून नंतर तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त परगावी गेलेल्या तरुणाची तिथल्या एका अल्पवयीन तरुणीसोबत ओळख झाली. आपण विवाहित असल्याची वस्तुस्थिती लपवून ठेवत त्याने तरुणीसोबत मैत्री केली आणि हळूहळू तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र काही दिवसांतच परिस्थिती बदलली आणि या तरुणाने अल्पवयीन मुलीला मारण्याचा (Murder of girl) निर्णय घेतला. काही दिवसांनी तिच्या नातेवाईकांना तिचा मृतदेह घेऊनच परत यावं लागलं. अगोदर तिचा खून करून मृतदेह फासावर लटकावण्यात आला आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. 

अशी घडली घटना

बिहारमधील पूर्णिया भागात राहणारा इकबाल नावाचा तरुण इलेक्ट्रिशिअन म्हणून काम करत होता. आजूबाजूच्या गावातून त्याला किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी बोलावणं येत असे. तातडीनं त्या घरी पोहोचून काम करून देण्यात तो तरबेज होता. त्यामुळे पंचक्रोशीत त्याचं नाव झालं होतं. कमी दरात चांगलं काम करून देणारा वायरमन म्हणून तो ओळखला जात होता. एक दिवस पूर्णियाजवळच्या एका गावातून त्याला कामासाठी फोन आला. 

कामादरम्यान झाली ओळख

वायरिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या इकबालची त्या घरात राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीशी ओळख झाली. पहिल्या भेटीत गोड बोलत त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि पुढच्या वेळी बाहेर भेटायला तयार केलं. त्यानंतर गावाबाहेर तिला बोलावून काहीवेळा तिची भेट घेतली आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर काही दिवसांनी हा तरुण तिला घेऊन गायब झाला आणि दिल्लीला निघून गेला. आपली लेक कुठे गायब झाली, हे घऱच्यांना काही दिवस समजलं नाही. त्यानंतर मात्र इकबालने ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना सांगितली. 

अधिक वाचा - Taiwan official death: तैवानच्या क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

पहिल्या लग्नाचा शोध

इकबालसोबत पळून जाऊन लग्न केल्यावर काही दिवसांनी त्याचं अगोदरही एक लग्न झाल्याचा शोध मुलीला लागला असावा, असा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. त्यामुळे इकबाल आणि त्या तरुणीमध्ये वादावादी सुरू झाली. काही दिवसांनी हा तरुण तरुणीला घेऊन परत आला आणि बिहारमधील बालुगंज परिसरात राहणाऱ्या आपल्या आत्त्याच्या घरी तिला ठेवलं. 

अधिक वाचा - बस दरीत कोसळली, ८ विद्यार्थ्यांसह १८ जखमी

आत्याकडेच केला खून

पहिल्या लग्नाच्या मुद्द्यावरून आणि आपली फसवणूक केल्याच्या मुद्द्यावरून तरुणी आक्रमक होत अल्याचं पाहून इकबालने त्याच्या कुटुंबीयांसह तिचा खून केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. जेव्हा हे नातेवाईक तिला भेटायला घरी गेले तेव्हा फासावर लटकलेला मुलीचा मृतदेह त्यांना दिसला. मुलीचे आईवडील तिथे आल्याचं पाहून इकबाल आणि त्याचे नातेवाईक तिथून पळून गेले. 

अधिक वाचा - Mahabharat style Marriage : भारतातील या भागात नवऱ्याचे भाऊ ‘भाऊजी’ नव्हे ‘पतीदेव’च असतात, वाचा सविस्तर

पोलीस तपास सुरू

या घटनेनंतर मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला असून इकबाल आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी