girl was dating 18 boys, romance scam exposed due to one mistake : मी फक्त तुझी आणि तुझीच आहे... लग्न करेन तर तुझ्याशीच अशी वचनं देत 18 तरुणांना भुलवणाऱ्या आणि त्यांच्याकडून गोड बोलून मोठी रक्कम उकळणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेने अविवाहित असल्याचे सांगून 18 तरुणांसोबत डेटिंग केले होते.
महिलेचे लग्न 2014 मध्ये झाले होते. पण झटपट भरपूर पैसा कमावण्यासाठी तसेच मौजमजेसाठी महिलेने डेटिंगचा पर्याय निवडला होता. या महिलेने एक दोन नाही तर अठरा तरुणांना भुलवले होते. प्रत्येकाला तुझ्याशी लग्न करणार असे सांगून महिलेने वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या. तरुणांनी महिला आपल्या प्रेमात आहे असे समजून तिची मदत करण्याच्या हेतूने मागणी केल्यावर चौकशी न करता पैसे दिले होते. या पद्धतीने महिलेने अठरा जणांकडून मिळून एकूण मोठी रक्कम उकळली होती. हा उद्योग सुरळीत सुरू होता. पण एका तरुणाने रजिस्टर लग्नाचा आग्रह धरला आणि पंचाईत झाली.
आधीच लग्न झाले असल्यामुळे महिलेने रजिस्टर लग्नाचा आग्रह होऊ लागताच आढेवेढे घेण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे तरुणाला संशय आला आणि त्याने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेचा रोमान्स घोटाळा उघड झाला. पोलिसांनी महिलेला अटक केली आणि तिच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली. रोमान्स घोटाळ्याचा फटका बसलेल्या सर्व तरुणांशी बोलून महिलेविरुद्धची केस भक्कम करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
हा रोमान्स घोटाळा चीनच्या शांघायमध्ये घडला. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार महिलेचे लग्न 2014 मध्ये झाले होते. तिने 2017 मध्ये पहिल्या तरुणाला भुलवले. यानंतर तरुणांना भुलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि अटक करेपर्यंत तिने एकूण 18 तरुणांना भुलवले होते. या तरुणांकडून महिलेने वेगवेगळी कारणे देत मोठी रक्कम उकळली होती. पोलीस या प्रकरणात तपास करून तसेच रोमान्स घोटाळ्याचा फटका बसलेल्या तरुणांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करत आहेत.
बॉलिवूड सेलिब्रेटींना हनीमूनसाठी आवडू लागलेल्या जागा