डॉक्टरने युवतीला दिलं नशेचं इंजेक्शन, नंतर केलं घाणेरडं कृत्य

लॉकडाऊन दरम्यान इंदूर येथे एका डॉक्टरांने युवतीवप बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

girl went to the clinic for treatment the doctor raped her by giving her injection
डॉक्टरने युवतीला दिलं नशेचं इंजेक्शन, नंतर केलं घाणेरडं कृत्य प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: unsplash) 

थोडं पण कामाचं

  • इंदूरमध्ये रुग्ण युवतीवर डॉक्टरकडून बलात्कार
  • नशेच इंजेक्शन देऊन डॉक्टरने युवतीवर केला शारीरिक अत्याचार
  • बलात्कारप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरला केली अटक

इंदूर: कोरोना व्हायरसविरूद्ध आरोग्य कर्मचारी हे सतत राबत आहेत. आज ते खऱ्या अर्थाने देशाचे हिरो आहेत. पण काही जण मात्र याला अपवाद असल्याचं दिसून येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार,  मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथील मानवता नगर भागात एक खासगी क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरने एका युवतीला आपल्या वासनेचा बळी बनवलं आहे. डॉक्टरने महिलेला अंमली पदार्थांचे इंजेक्शन देऊन तिच्या बलात्काराची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून नागेंद्र असे त्याचे नाव आहे.

इंदूरमध्ये लॉकडाऊन दरम्यान देखील खासगी क्लिनिक सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण त्यावर सध्या बंदी आहे. काही दिवसांपूर्वीच इंदूरमध्ये दोन खासगी दवाखाने चालविणार्‍या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर नागेंद्र क्लिनिक सुरु करुन रुग्णांवर नेमके कोणते उपचार करत होते?   सध्या पोलिस बलात्कार प्रकरणातील सर्व बाबींचा शोध घेत आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, दोन दिवसांपूर्वी पीडित युवतीची तब्येत बिघडली होती. यानंतर ती मानवता नगर परिसरातील डॉक्टर नागेंद्र यांच्या क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी गेली होती. 


  
जेव्हा पीडित युवती क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली तेव्हा डॉक्टरने तिला इंजेक्शन दिले. उपचाराचा भाग समजून युवतीने देखील इंजेक्शन घेतले. पण इंजेक्शन दिल्यानंतर थोड्याच वेळात ती बेशुद्ध झाली. पण जेव्हा युवती शुद्धीवर आली तेव्हा डॉक्टरच्या कृत्याच्या पर्दाफाश झाला. जेव्हा पीडिता घरी पोहोचली तेव्हा तिने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. युवतीने याप्रकरणी मंगळवारी पोलीस ठाण्यात तक्रार देखील  दाखल केली. ज्यानंतर पोलीस कारवाई सुरु केली. यावेळी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरला अटक केली.

दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली असून डॉक्टरने याआधी देखील असं कृत्य केलेलं आहे का? याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी