मुली फोनवर बोलतात अन् मुलांबरोबर पळून जातात, मुली बिघडण्यास त्यांची आई जबबादार: युपी राज्य महिला आयोग सदस्या

उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.

Girls talk on the phone and run away with boy
मुली फोनवर बोलतात अन् मुलांबरोबर पळून जातात  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांचं मुलींविषयी वादग्रस्त विधान
  • मुली फोनवर बोलता बोलता मुलांबरोबर पळून जातात.
  • महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीबद्दल स्वतः समाज गंभीर असला पाहिजे. - मीना कुमारी

लखनौ : उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मीना कुमारी यांचे हे वक्तव्य मुलींशी संबंधित असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुली मोबाइलवर तासन् तास बोलत असतात, त्यामुळे मुलींना मोबाइल देऊ नये, असे विधान मीना कुमारी यांनी केलं आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, जर मुली बिघडल्या तर त्यासाठी त्यांची आई पूर्णपणे जबाबदार आहे.

मीना कुमारी काही कार्यक्रमानिमित्त बुधवारी अलिगड येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मीना कुमारी म्हणाल्या, की "समाजातील महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीबद्दल स्वतः समाज गंभीर असला पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये मोबाईल एक मोठी समस्या बनली आहे. मुली मोबाईलवर तासनतास बोलत असतात. मुलांसोबत फिरत असतात. त्यांचे मोबाइल तपासले जात नाहीत, कुटुंबियांना याची माहिती नसते. आणि मग मोबाईलवर बोलता बोलताच त्या मुलांबरोबर पळून जातात.

मुलींना मोबाईल देऊ नका आणि जर तुम्ही मोबाईल दिले तर त्यांचे पूर्ण निरीक्षण करा. ते म्हणाले की मातांवर मोठी जबाबदारी असते. जर आज मुलींचा नाश झाला तर त्यासाठी आईच जबाबदार आहेत, असेही त्या म्हणाल्या.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी