ऑपरेशन ऑल आऊट, नाकात औषध फवारा आणि कोरोनाचा खात्मा करा

Glenmark nasal spray cuts down viral load of Covid by 94 percent in 24 hrs : भारतात १ लाख ३९ हजार ७३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना संकट अद्याप संपलेले नाही. या अशा परिस्थितीत कोरोना संकटाने त्रस्त असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Glenmark nasal spray cuts down viral load of Covid by 94 percent in 24 hrs
ऑपरेशन ऑल आऊट, नाकात औषध फवारा आणि कोरोनाचा खात्मा करा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ऑपरेशन ऑल आऊट, नाकात औषध फवारा आणि कोरोनाचा खात्मा करा
  • 'फॅबी स्प्रे' या नावाने भारतीय औषध बाजारात लाँच होणार
  • परवानगी मिळाल्यानंतर फेब्रुवारी २०२३ पर्यंत स्प्रे भारतीय बाजारात लाँच होणार

Glenmark nasal spray cuts down viral load of Covid by 94 percent in 24 hrs : भारतात १ लाख ३९ हजार ७३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना संकट अद्याप संपलेले नाही. या अशा परिस्थितीत कोरोना संकटाने त्रस्त असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच एक औषधी स्प्रे उपलब्ध होणार आहे. नाकपुड्यांमध्ये औषधाचा फवारा मारल्यावर कोरोना विषाणूचा नायनाट होणार आहे. 

कोरोना काळात DOLO मेडिसीन डॉक्टर का लिहून द्यायचे?, इन्कम टॅक्सच्या छाप्यात उलगडले 1000 कोटींच्या गिफ्टचे रहस्य!

भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण केरळमध्ये

कोरोना संकटाला वैतागलेल्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. ग्लेनमार्क नावाच्या कंपनीने औषधी स्प्रे विकसित केला आहे. कंपनीचा दावा आहे की नाकपुड्यांमध्ये औषधाचा फवारा मारला तर पुढील २४ तासांमध्ये कोरोनाचे ९४ टक्के विषाणू आणि ४८ तासांमध्ये ९९ टक्के विषाणू नष्ट होतात. यामुळे रुग्ण कोरोनामुक्त होण्यास मोठी मदत होते.

ग्लेनमार्क कंपनीने नायट्रिक ऑक्साइडचा वापर करून कोरोना विषाणूचा नायनाट करणारा औषधी स्प्रे विकसित केला आहे. स्प्रेमधील औषध नाकपुड्यांमध्ये फवारल्यास २४ तासांत परिणाम दिसून येतो आणि कोरोना लवकर बरा होतो असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनी त्यांचा स्प्रे 'फॅबी स्प्रे' या नावाने भारतीय औषध बाजारात लाँच करणार आहे. 

कंपनीने भारतात आतापर्यंत २० क्लिनिकल टेस्ट केल्या आहेत. या टेस्ट वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झाल्या आहेत. ज्यांच्या शरीरात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असे कोरोना प्रतिबंधक लस घेतलेले आणि लस न घेतलेले नागरिक चाचणीसाठी निवडण्यात आले होते. त्यांचे दोन गट करण्यात आले. यापैकी फक्त एका गटावर स्प्रे द्वारे उपचार करण्यात आले. ज्यांच्यावर स्प्रे द्वारे उपचार झाले ते २४ तासांत बरे झाल्याचे आढळले. 

स्प्रे द्वारे उपचार करण्यासाठी कोरोना रुग्णाला नाकपुड्यांमध्ये दिवसातून सहा वेळा औषध फवारण्यास सांगण्यात आले होते. द लॅन्सेट नावाच्या वैज्ञानिक संशोधनाची माहिती प्रसिद्ध करणाऱ्या मासिकात चाचणीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालानुसार स्प्रे द्वारे उपचार करणारे कोरोना रुग्ण २४ तासांत बरे झाले. नाकपुड्यांमध्ये स्प्रे द्वारे औषध फवारल्यानंतर कोरोना विषाणूची वाद एकदम मंदावली आणि विषाणूची शरीरावर परिणाम करण्याची क्षमता वेगाने कमी झाली. याआधी कॅनडात झालेल्या चाचणीतही असेच परिणाम दिसून आले. यामुळे कंपनीने भारतीय बाजारात नाकपुड्यांमध्ये फवारण्याचा स्प्रे लाँच करण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. 

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (Drugs Controller General of India - DCGI) यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर फेब्रुवारी २०२३ पर्यंत स्प्रे भारतीय बाजारात लाँच करणार असल्याचे कंपनीने सांगितले. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कंपनीने दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी