ऐतिहासिक घटना, मनिलात जन्मलेल्या चिमुकलीची जगभर चर्चा

Global population 2022 : Symbolic 8 billionth baby born in Manila : एक ऐतिहासिक घटना घडली आहे. फिलीपिन्सची राजधानी मनिला येथे ही घटना घडली.

Global population 2022 : Symbolic 8 billionth baby born in Manila
ऐतिहासिक घटना, मनिलात जन्मलेल्या चिमुकलीची जगभर चर्चा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ऐतिहासिक घटना, मनिलात जन्मलेल्या चिमुकलीची जगभर चर्चा
  • जागतिक चर्चेचे कारण ठरलेल्या मनिलातील चिमुरडीचे नाव विनिस माबनसाग
  • जगातली 8 अब्जावी मुलगी

Global population 2022 : Symbolic 8 billionth baby born in Manila : एक ऐतिहासिक घटना घडली आहे. फिलीपिन्सची राजधानी मनिला येथे ही घटना घडली. मनिलात एका महिलेने चिमुरडीला जन्म दिला. या चिमुकलीच्या जन्माने जगाची लोकसंख्या 800 कोटी अर्थात 8 अब्ज एवढी झाली. याच कारणामुळे मनिलात जन्मलेल्या मुलीची जगभर चर्चा सुरू आहे. या मुलीच्या जन्मानंतर जगभर लोकसंख्या या मुद्यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

जागतिक चर्चेचे कारण ठरलेल्या मनिलातील चिमुरडीचे नाव विनिस माबनसाग असे ठेवण्यात आले आहे. चिमुरडीच्या जन्माने तिची आई मारिया मार्गरेट विलोरेंट प्रचंड खुषीत आहेत. आपली मुलगी ही जगातली 8 अब्जावी मुलगी असल्याचे कळल्यामुळे आईचा आनंद द्विगुणीत झाला आहे. माझ्या मुलीची जगभर चर्चा होत आहे. हा तिला जगाकडून लाभलेला एक प्रकारचा आशीर्वाद आहे, असे मार्गरेट विलोरेंट म्हणाल्या. 

Influencer Earning: जागेपणी आराम, झोपेत कमाई! झोपेच्या भांडवलावर कमावतो महिन्याला 28 लाख

Viral Video : कुरकुरे खाणाऱ्या खारुताई

Viral Video : विद्यार्थ्याने शिक्षकाला चोपले

जगासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या चिमुरडीचा जन्म मेडिकल टीमच्या देखरेखीत पण नैसर्गिकरित्या झाला आहे. आई आणि मुलीची तब्येत उत्तम स्थितीत आहे. 

विनिस माबनसाग हिचा जन्म मध्यरात्री 1.29 वाजता झाला. तिच्या जन्मानंतर हॉस्पिटल प्रशासनाने ती जगातली 8 अब्जावी व्यक्ती असल्याचे सांगितले. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या 2100 पर्यंत 10 अब्जांचा टप्पा ओलांडणार आहे. 

सध्या फिलीपिन्स या देशाचा जन्मदर 1.9 एवढा कमी आहे. देशात एक महिला दोन पेक्षा कमी मुलांना जन्म देते. याआधी 2017 मध्ये फिलीपिन्स या देशाचा जन्मदर 2.7 होता. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालाच्या मते 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.5 अब्जांचा टप्पा ओलांडेल. तसेच 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या 9.7 अब्जांचा टप्पा ओलांडेल. तज्ज्ञांच्या मते 2100 मध्ये जगाची लोकसंख्या 10.4 अब्जचा टप्पा ओलांडेल. 

लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी ज्यांचा जन्मदर जास्त आहे त्या समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी