सोलापूर: शैक्षणिक क्षेत्रात (Education sector) मानाचा (prestigious) समजला जाणारा जागतिक पातळीवरचा (global level) ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) मिळवणारे देशातले पहिलेवहिले शिक्षक (teacher) रणजीतसिंह डिसले (Ranjit Singh Disale) यांची नेमणूक (appointment) जागतिक बँकेचे (World Bank) शैक्षणिक सल्लागार (educational advisor) म्हणून करण्यात आली आहे. जून 2021 ते जून 2024 या तीन वर्षांसाठी ते या पदावर राहून जागतिक बँकेसाठी काम करतील.
संपूर्ण जगातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधाररण्यासाठी जागतिक बँकेने ग्लोबल कोच नावाचा उपक्रम सुरू केला आहे. जगभरातल्या मुलांना मिळत असलेल्या शैक्षणिक पातळीत वृद्धी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांची वेगवेगळी ध्येये गाठण्यासाठी जगातल्या 12 तज्ञ व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातल्या शिक्षकांच्या घडणीसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे डिसले यांनी सांगितले.
युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार हा सोलापूरच्या परितेवाडी शाळेत काम करणाऱ्या रणजीतसिंह डिसले यांना गेल्यावर्षी जाहीर झाला होता. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले होते. रणजीतसिंह डिसले यांच्या नावाने इटली देशातील विद्यार्थ्यांना एक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. कार्लो मझोने – रणजीत डिसले शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे. सॅमनिटे राज्यातल्या 10 विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीची ही रक्कम 400 युरोंची आहे.
जगभरातल्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात एकसूत्रता आणणे, त्यांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करणे इत्यादी उद्दिष्टे या उपक्रमांतर्गत साध्य करण्याचे लक्ष्य आहे. जगभरातून 12 व्यक्तींमध्ये भारताच्या रणजीतसिंह डिसले यांच्या नेमणुकीमुळे त्यांच्यासोबतच भारताच्या आणि देशाच्या शिरपेचातही एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.