पंतप्रधान मोदींच्या चेन्नई दौऱ्यापूर्वी #GoBackModi ट्विटरवर ट्रेंडिंग, तब्बल साडेतीन लाख ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी तेंलगणातील हैदराबाद आणि तामिळनाडूची (Tamilnadu) राजधानी चेन्नईमध्ये विविध विकासकामांचं लोकार्पण करणात आहेत. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यावेळी तिथल्या नेटकऱ्यांकडून #GoBackModi हा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड आजच्या दिवसात प्रथम क्रमांकावर राहिला आहे.

Tamil brothers angry with Modi; #GoBackModi Trending on Twitter
तमिळ बांधव मोदींवर नाराज; #GoBackModi ट्विटरवर ट्रेंडिंग  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यावेळी तिथल्या नेटकऱ्यांकडून #GoBackModi हा ट्रेंड सुरू
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पाच प्रकल्पांचं लोकार्पण करणार
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ मध्ये २७ जानेवारी, १० फेब्रुवारी आणि १ मार्च तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी देखील #GoBackModi हा ट्रेंड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी तेंलगणातील हैदराबाद आणि तामिळनाडूची (Tamilnadu) राजधानी चेन्नईमध्ये विविध विकासकामांचं लोकार्पण करणात आहेत. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यावेळी तिथल्या नेटकऱ्यांकडून #GoBackModi हा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड आजच्या दिवसात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. दरम्यान, याआधीही पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडिया मोहिम राबवण्यात आली होती. आज देखील नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादिवशी हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. आज जवळपास ३ लाख ५६ हजार ट्विटस हा ट्रेंड वापरुन करण्यात आला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी आज सायंकाळी ५.४५ वाजता चेन्नईतील जेएलएन इनडोअर स्टेडिअममध्ये 31,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या 11 प्रकल्पांची पायाभरणी करुन, काही प्रकल्प देशाला समर्पित करतील. 

#GoBackModi हा ट्रेंड कधी सुरु झाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ एप्रिल २०१८ रोजी तामिळनाडूमध्ये संरक्षणविषयक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी जाणार होते. तत्कालीन विरोधी पक्ष म्हणजेच डीएमकेच्यावतीनं नरेंद्र मोदींना कावेरी प्रकल्पाला उशीर होत असल्याच्या कारणामुळं काळे झेंडे दाखवण्याची घोषणा करण्यात आली होती. तामिळनाडूच्या एका परदेशात वास्तव्यास असलेल्या नेटकऱ्यानं आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी नवी दिल्लीत १५० दिवस आंदोलन केलं होतं त्याकडे नरेंद्र मोदींनी दुर्लक्ष केल्याचं म्हटलं. 

तामिळनाडूची नीट परीक्षेविरोधाची भूमिका, ओचकी चक्रीवादळावेळी केंद्राची भूमिका आणि कावेरी प्रकल्पाचा विलंब या कारणामुळं तामिळ नेटकऱ्यांनी १२ एप्रिल २०१८ ला #GoBackModi हा ट्रेंड वापरुन ट्विट केली. तामिळनाडूतील आणि जगभरातील तामिळ नेटकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ मध्ये २७ जानेवारी, १० फेब्रुवारी आणि १ मार्च तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी देखील #GoBackModi हा ट्रेंड सुरु करण्यात आला होता.

आजही #GoBackModi ट्रेंड 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईत पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी, दळणवळण वाढवण्यासाठी आणि या क्षेत्रातील जनतेच्या जीवनातील सुलभतेला चालना देण्यासाठी काही प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. तसेच चेन्नईमध्ये 31,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 11 प्रकल्पांची पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर येणार असल्यानं तामिळ नेटकऱ्यांनी #GoBackModi हा ट्रेंड वापरुन ३ लाख ४३ ट्विटस केली आहेत. 

पाच प्रकल्पांचं देशाला लोकार्पण

  • चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पाच प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. 75 किमी लांबीच्या मदुराई-तेनी (रेल्वे गेज रूपांतरण प्रकल्प) या सुमारे 500 कोटी रुपये प्रकल्पखर्चाच्या या प्रकल्पामुळे या भागात सुगमता निर्माण होऊन या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल.
  • 590 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तांबरम - चेंगलपट्टू दरम्यान 30 किमी लांबीच्या तिसऱ्या रेल्वेमार्गामुळे उपनगरीय मार्गांवरील सेवा अधिक उत्तम प्रकारे सुलभ होईल आणि आरामदायी प्रवासात वाढ होईल.
  • सुमारे 850 कोटी रुपये प्रकल्पखर्चाचा 115 किमी लांबीचा एन्नोर-चेंगलपट्टू आणि सुमारे 910 कोटी रुपये प्रकल्पखर्चाची ईटीबीपीएनएमटीच्या (ETBPNMT)तिरुवल्लूर-बेंगळुरू क्षेत्रातील 271 किमी लांबीची नैसर्गिक गॅस पाईपलाईन यामुळे तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील उद्योगांना तसेच इतर ग्राहकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा सुलभ होईल.

या कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजना-शहरी याअंतर्गत लाइट हाऊस प्रकल्प- चेन्नईचा एक भाग म्हणून बांधलेल्या 116 कोटी रुपये खर्चाच्या 1152 घरांचे उद्‌घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 28,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सहा प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी