Gold Silver Price: अमेरिकेत व्याजदर घटण्याचे संकेत; सोन्याच्या दरात उच्चांकी उसळी

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 11, 2019 | 21:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Silver Price: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम असून, रूपयाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याला ही झळाळी आल्याचे दिसत आहे. चांदीच्या भावात किलोमागे ३०० रूपयांनी तेजी पाहायला मिळाली.

Gold Silver Rates
सोन्याच्या दर ३५ हजारांच्या पलिकडे   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेत व्याज दर कपातीचे संकेत
  • गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे वाढला कल
  • डॉलरच्या किमतीवरही परिणाम

मुंबई : भारतात सोन्याच्या दरांनी आज उच्चांकी उसळी घेतली. दिल्लीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याचा दर (प्रति तोळा) ९३० रूपयांनी वाढला. तर, चांदीच्या भावात ३०० रूपयांनी (प्रति किलो) तेजी पहायला मिळाली. सोने ९३० रूपयांनी वाढल्यामुळे ३५ हजार रूपयांच्या (प्रति तोळा) उंबरठ्यावर असलेले सोने ३५ हजार ८०० रूपयांवर गेले. तर चांदी ३०० रूपयांनी वाढून ३९ हजार २०० रूपये प्रति किलोवर स्थिरावली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम असून, रूपयाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याला ही झळाळी आल्याचे दिसत आहे. काल अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी व्याज दरात कपाती होण्याची शक्यता असल्याचे सांगितल्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरच्या किमतीवर झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक करायला सुरूवात केली. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दरांत ०.२५ टक्क्यांची कपात करू शकते.

भारतात मागणी घटण्याची शक्यता

दरम्यान, एमसीएक्सवर सोन्याचा दर ३४ हजार १४५ रूपये या उच्चांकी पातळीवर पोहोचला. केडिया कमॉडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार सोन्याचा दर जर एमसीएक्सवर ३५ हजार रूपयांवरर टिकून राहिला तर, बाजारात सोन्याचे दर ३६ हजार २०० ते ३६ हजार ५०० रूपयांपर्यंत जाऊ शकतात. भारतीय बाजारात सोन्याला कायमच मागणी असते. पण, दर वाढल्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये भारतातही घट होऊ शकते, असे मत केडिया यांनी व्यक्त केले आहे. सोन्यावर बजेटमध्ये इम्पोर्ट ड्युटी वाढवण्यात आली आहे. सोन्यावर आता एकूण टॅक्स १५.५ टक्के झाला आहे. यात तीन टक्के जीएसटीचाही समावेश आहे.

जागतिक अर्थव्यवस्था मंदावली

जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये कमॉडिटी रिसर्चचे प्रमुख असलेले हरिष व्ही म्हणाले, ‘अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या चेअरमननी दिलेल्या संकेतांनंतर सोन्याचे दर आठवड्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. फेडरल बँकेचे चेअरमन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेत व्याजदर कमी करण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेले व्यापार युद्धही अजून सुरूच आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. परिणामी सोन्यात तेजी दिसत आहे.’ आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १ हजार ४२० डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर १५.२८ डॉलर प्रति औंस आहे. दिल्लीच्या सराफ बाजारपेठेत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर ३५ हजार ८०० तर, ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा दर ३५ हजार ६३० रुपये आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Gold Silver Price: अमेरिकेत व्याजदर घटण्याचे संकेत; सोन्याच्या दरात उच्चांकी उसळी Description: Gold Silver Price: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम असून, रूपयाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याला ही झळाळी आल्याचे दिसत आहे. चांदीच्या भावात किलोमागे ३०० रूपयांनी तेजी पाहायला मिळाली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक 
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक