Agriculure Loan: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Cabinet decision: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
  • ३ लाखांपर्यंतच्या कमी कालावधीच्या कर्जावर सवलत
  • कर्जावरील व्याजावर १.५ टक्के सवलत मिळणार

Big decision of Modi Government about Agriculure loan: केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कमी कालावधीच्या आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी interest subention scheme (इंट्रेस्ट सबवेंशन स्कीम) सरकारने जाहीर केली आहे. यानुसार, ३ लाखांपर्यंतच्या कमी कालावधीच्या कर्जावर सवलत देण्यात येणार आहे. 

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. अल्प मुदतीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकऱ्यांसाठी व्याजात सवलत देणारी योजना केंद्र सरकारने सुरू ठेवली आहे. म्हणजेच ३ लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याजात १.५ टक्के इतकी सूट मिळणार आहे.

३ लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर वार्षिक दीड टक्का व्याज सवलतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कृषी क्षेत्रात पुरेसा पैसा खेळता रहावा याची ग्वाही देणारा हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारला २०२२-२३ या वर्षासाठी ३४,८५६ कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद आवश्यक असणार आहे. भरपाईसाठी केंद्र सरकार ही देयके देणाऱ्या बँक आणि सहकारी संस्थांना थेट देईल.

अधिक वाचा : हिंगोलीच्या सभेत CM शिंदेंनी टाकलं आश्वासनच हिंग; विविध विभागांतील 80 हजार पदे भरणार, शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देणार

काय होणार फायदे? 

कृषी कर्जावरील व्याजावर सवलत दिल्याने कर्ज देणाऱ्या संस्था, ग्रामीण बँकांची आर्थिक स्थिती आणि व्यवहार हे सुरळीत राहतील. विशेष करुन ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका आहेत ज्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला पुरेशा प्रमाणात कृषी कर्जाची मदत होईल. यासोबतच शेतकऱ्यांनाही अल्पकालीन कृषी गरजांसाठी कर्ज घेण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा लाभ मिळू शकेल.

अधिक वाचा : भाजपच्या संसदीय समितीची घोषणा; दिल्लीश्वरांचा महाराष्ट्र भाजपला धक्का

तसेच पशुसंवर्धन, दुग्ध, कुक्कुटपालन, मत्सपालन यासोबतच इतर कृषी संबंधित कामांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. कर्जाची वेळेवर परतफेड करताना शेतकऱ्यांना वार्षिक ४ टक्के व्याजदराने अल्प मुदतीचे कृषी कर्ज मिळत राहणार आहे.

किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज 

सध्या केंद्र सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कमी व्याज दरावर कर्ज देण्यात येते. ज्या शेतकऱ्यांकडे हे किसान क्रेडिट कार्ड नाहीये असे शेतकरी आपल्या ब्लॉक विभागात जाऊन त्यांचे किसान क्रेडिट कार्ड तयार करु शकतात. जर एखाद्या शेतकऱ्याने किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतले तर त्यांना ४ टक्के व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. इतकेच नाही तर पीएम किसान सन्मान निधीचा लाभ सुद्धा किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी