प्रवाशांसाठी खूशखबर! आता विनाआरक्षण करता येणार रेल्वे प्रवास

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे, पण याचदरम्यान रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Good news for passengers now you can travel on railway
आता आरक्षण न करता येणार रेल्वे प्रवास  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रेल्वे विभाग अनारक्षित रेल्वे सेवा सुरू करणार
  • रेल्वे भाडे मात्र राहणार जास्त
  • अनारक्षित रेल्वे विशेष रेल्वेच्या नावाने धावणार

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे, पण याचदरम्यान रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. प्रवाशांसाठी रेल्वेने आता राखीव नसलेल्या (unreserved trains) गाड्या सुरू निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्ली-एनसीआरसह सहारनपूर-अमृतसर, फिरोजपूर आणि फजिल्कासह अनेक ठिकाणांवरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

५ एप्रिलपासून धावणार गाड्या

उद्या म्हणजेच ५ एप्रिलपासून ज्यादा अनारक्षित रेल्वे प्रवास सोपा करणार आहेत. उत्तर रेल्वे (Northern Railway) ने एकूण ७१ अनारक्षित  मेल आणि एक्सप्रेस रेल्वेंची यादी जाहीर केली आहे. रेल्वे मंत्रालयाने शनिवारी ट्विट करुन याविषयीची माहिती दिली आहे. भारतीय रेल्वे रेल्वे प्रवाशांच्या सुविधेत वाढत करत असून ५ एप्रिल ते ७१ अनारक्षित रेल्वे सेवांची सुरुवात करत आहे. 'ह्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास  खात्रीशीर सुरक्षित आणि आरामदायक करतील.' या ट्विटसह एक लिंक पण देण्यात आली आहे, ज्यात रेल्वेची पूर्ण यादी देण्यात आली आहे.   

 


भाडे मात्र जास्तच राहणार

 

कोविड-१९ मुळे अनारक्षित रेल्वे विशेष रेल्वेच्या नावाने चालतील. यामुळे या रेल्वेचे भाडे कमी होणार नाही, तर मेल आणि एक्सप्रेससारखेच याचे भाडे असणार आहे. रेल्वे विभागाच्या मतानुसार, सहारनपुर-दिल्ली जंक्शन, फिरोजपुर कॅट-लुधियाना, फजिल्का-लुधियाना, बठिंडा-लुधियाना, वाराणसी-प्रतापगढ़, सहारनपुर-नवी दिल्ली, जाखल-दिल्ली जंक्शन, गाजियाबाद-पानीपत, शाहजहांपुर-सीतापुर, गाजियाबाद-मुरादाबादसह अनेक शहरांसाठी अनारक्षित रेल्वे धावणार आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी