दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०३ नोव्हेंबर २०१९: राऊतांचा अजित पवारांना मॅसेज ते शिवसेनेला नवी ऑफर

Headlines of the 03th November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०३ नोव्हेंबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०३ नोव्हेंबर २०१९:  आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... संजय राऊत यांनी अजित पवारांना मेसेज केला. बैठकीत असताना अजित पवारांना मेसेज आला. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसरी आजची महत्त्वाची बातमी,  राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर आता सत्ता स्थापनेसाठीचा संघर्ष सुरु आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यात सध्याच्या परिस्थितीत काय घडू शकतं त्याचे पाच पर्याय सांगितले आहेत. तिसरी आजची महत्त्वाची बातमी, लवकरात लवकर सरकार स्थापन करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. चौथी आजची बातमी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं प्रति हेक्टर 25 हजार रूपये मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे. पाचवी आजची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नवा प्रस्ताव दिल्याचं समजतंय. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. संजय राऊत यांनी अजित पवारांना पाठवला 'हा' मेसेज : राज्यात सत्ता स्थापनेवरुन शिवसेना-भाजपत रस्सीखेच सुरु असताना आता अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. संजय राऊत यांनी सांगितले सत्ता स्थापनेचे ५ पर्याय : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर आता सत्ता स्थापनेसाठीचा संघर्ष सुरु आहे. त्यातच शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून नवनवे वक्तव्य केली जात आहेत. बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  3. लवकर सरकार स्थापनं करणं गरजेचं, पेच लवकरच सुटणार: मुख्यमंत्री : लवकरात लवकर सरकार स्थापन होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या घडामोडींवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. बातमी वाचा सविस्तर.
  4. सरकारची मदत तुटपुंजी, आम्ही सत्तेत आल्यानंतर सातबारा कोरा करणार: उद्धव ठाकरे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे,अशी मागणी ठाकरेंनी केली. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. भाजपला 50-50 चा फॉर्म्युला मान्य, पण एक अट...शिवसेनेपुढे नवी ऑफर :  शिवसेना भाजपला राज्यातल्या मतदारांनी महायुतीला मतदान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नवा प्रस्ताव दिल्याचं समजतंय. सविस्तर बातमी येथे वाचा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी