Google Doodle: Google कडूनही 15 ऑगस्ट साजरा, सर्च इंजिन दिसलं रंगीबेरंगी रंगात; स्पेशल Doodle

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 15, 2022 | 08:33 IST

Google Doodle on 15 August 2022: आज देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा (Independence Day 2022) अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.

Google Doodle on 15 August 2022
खास Doodle 
थोडं पण कामाचं
  • आज देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
  • स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलनं अनोखं डूडल (Doodle) बनवलं आहे.
  • स्वातंत्र्यदिनी सर्च इंजिन (Search Engine) गुगलही स्वातंत्र्याच्या रंगात रंगलेलं दिसलं.

 नवी दिल्ली:  Independence Day 2022 Google Doodle: आज देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा (Independence Day 2022) अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशातच गुगलनेही (Google) आजचा दिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. स्वातंत्र्यदिनी सर्च इंजिन (Search Engine)  गुगलही स्वातंत्र्याच्या रंगात रंगलेलं दिसलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलनं अनोखं डूडल (Doodle) बनवलं आहे.

आजच्या डूडलमध्ये रंगीबेरंगी पतंग उडवताना दाखवण्यात आले आहेत. हे पतंग भारताने आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या उंचीचे प्रतीक दर्शवित आहेत. गुगलने तिरंग्याचे तीन प्रमुख रंग (भगवा, पांढरा आणि हिरवा) वापरण्यासह 15 ऑगस्ट रोजी भारतात घडणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. पतंग उडवल्यासारखे. डूडलमध्ये उगवणारा सूर्य. पहाटे सूर्याच्या नवीन किरणांमध्ये हिरवाईत पतंग बनवणारी एक स्त्री आणि तिच्याभोवती पतंग उडवणारी काही मुलं दिसत आहेत.

अधिक वाचा- क्लीन चिट मिळताच समीर वानखेडेंचा पलटवार, नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ    

डूडलमध्ये बनवलेल्या पतंगांवरून हे समजू शकते की ते भारताने 75 वर्षात मिळवलेल्या उंचीचे प्रतीक आहे.  केरळची कलाकार नीतीने हे डूडल तयार केले आहे, ज्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरे करताना दाखवण्यात आले आहे.

भारतात दरवर्षी 15 ऑगस्टला पतंगबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. पतंग उडवणे ही एक जुनी परंपरा आहे. ही परंपरा देखील भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. दिल्ली ते उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि पंजाबमध्ये पतंग उडवण्याचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.


पंतप्रधानांनी दिल्या देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटमध्ये ते म्हणाले, "देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!". पंतप्रधानांनी आज सकाळी (15 ऑगस्ट 2022) लाल किल्ल्याच्या तटबंदीवर राष्ट्रध्वज फडकवला. ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी देण्यात आली. दोन Mi17 OneV हेलिकॉप्टरने राष्ट्रध्वज फडकवताच पुष्पवृष्टी केली,.यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी