दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ जानेवारी २०२०: उदयनराजे संतापले ते राज्यात पोलीस भरती 

Headlines of the 14th January 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ जानेवारी २०२०: उदयनराजे संतापले ते राज्यात पोलीस भरती   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १४ जानेवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज (सोमवार) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावर जोरदार टीका केली.पण याचवेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. दुसरी बातमी म्हणजे, भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली.  त्यांच्या या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देऊन राजेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. तिसरी बातमी, आज के शिवाजी- नरेंद्र मोदी पुस्तक अखेर मागे घेतलं आहे. पुस्तकावरुन वाद निर्माण झाल्यानंतर लेखकाने माफी मागून पुस्तक मागे  घेतलं. चौथी बातमी,  २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. या नराधमांना २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी दिली जाणार आहे. पाचवी बातमी, लवकरच गृह विभाग सात ते आठ हजार पोलीस पदांवर पोलीस भरती करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. 'शिव काढून ठाकरे सेना नाव ठेवा', उदयनराजे प्रचंड संतापले, शरद पवारांवरही टीका: भाजप नेते उदयनराजे यांनी महाविकास आघाडीवर अक्षरश: टीकेची झोड उठवली. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवाजी राजांवरील पुस्तकावरुन अनेकांना सुनावलं. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  2. उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, जितेंद्र आव्हाडांचा जोरदार पलटवार: भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यत्तर देऊन राजेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  3. 'ते' वादग्रस्त पुस्तक अखेर घेतलं मागे, भाजपच्या 'या' बड्या मंत्र्याने दिली माहिती: २०१२मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज दोषींची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता या नराधमांना फाशी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  4. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली: 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद अंगलट येण्याची चिन्ह दिसू लागल्याने आता हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. पुस्तक मागे घेण्याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 
  5. राज्यात लवकरच ७ ते ८ हजार पदांसाठी होणार पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती:  महाविकास आघाडीच्या गृहविभागाने सध्या मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी