दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३ जानेवारी २०२०: अजित पवार-अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी ते एसबीआयत मेगाभरती

Headlines of the 2nd January 2020: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३ जानेवारी २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३ जानेवारी २०२०: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे...  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याचं वृत्त नुकतंच समोर येत आहे. हे वृत्त काही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.  दुसरी बातमी, अमित शहांनी झारखंडच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने विचारांना तिलांजली दिल्याची अमित शहांनी टीका केली आहे. तिसरी बातमी, बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. फसवणुकीच्या आरोपानंतर रेमोच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गाझियाबाद पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला. चौथी बातमी, नववर्षाच्या सुरूवातीलाच सामान्यांच्या खिशाला अधिक कात्री बसणार आहे. कारण २०२० वर्षाची सुरूवातच पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनं झालीय. सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहेत. पाचवी बातमी, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक मंदी आणि बेरोजगारामुळे चिंता वाढली होती.  आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक  ऑफ इंडिया मध्ये सुमारे ८ हजार क्लार्कची भरती होणार आहे. या सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात जोरदार खडाजंगी?, बैठकीत असं काय घडलं? : खातेवाटपासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात जोरदार खडाजंगी झाली असल्याचं समजतं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

'मी पळ काढणार नाही, 'ती' जबाबदारी माझीच,' अमित शाहा कशाविषयी म्हणाले असं? : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी झारखंडच्या पराभावाची जबाबदारी स्वत: स्वीकारली आहे. यावेळी त्यांनी पराभवावर चिंतन करु असंही म्हटलं आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा पासपोर्ट जप्त करण्यामागचं नेमकं कारण काय? : बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. फसवणुकीच्या आरोपानंतर रेमोच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गाझियाबाद पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

Petrol Price Today: नववर्षात पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा कडाडले, जाणून घ्या आजचे दर:  नववर्षाच्या सुरूवातीलाच सामान्यांच्या खिशाला अधिक कात्री बसणार आहे. कारण २०२० वर्षाची सुरूवातच पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनं झालीय. सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहेत. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

 मराठी तरुणांसाठी खुशखबर, स्टेट बँकेत ८ हजार जागांची मेगाभरती:  गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक मंदी आणि बेरोजगारामुळे चिंता वाढली होती.  आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक  ऑफ इंडिया मध्ये सुमारे ८ हजार क्लार्कची भरती होणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी