Cyber Crime : आपल्या लहान मुलांना स्मार्टफोन वापरायला देताय तर सावधान, लागू शकतो हजारो रुपयांचा चुना

अनेक पालकांची इच्छा असते की आपल्या लहान मुलांनी स्मार्टफोन वापरू नये. जितके शक्य असल्याने पालक आपल्या मुलांना फोनपासून दूर ठेवतात. परंतु पालकांकडील असेलेला मोबाईल लहान मुले वापरतातच. तसेच त्यांना फोन न दिल्यास ते चिडचीड करतात आणि रडतात. त्यामुळे अनेक वेळेला नाईलाजाने पालक आपल्या मुलांकडे फोन देतात. परंतु याच सवयीपासून पालकांनी दूर असणे गरजेचे आहे. अन्यथा पालकांनाच याचा भुर्दंड भरावा लागणार आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

kid using mobile
सायबर क्राईम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अनेक पालकांची इच्छा असते की आपल्या लहान मुलांनी स्मार्टफोन वापरू नये. जितके शक्य असल्याने पालक आपल्या मुलांना फोनपासून दूर ठेवतात
  • परंतु पालकांकडील असेलेला मोबाईल लहान मुले वापरतातच. तसेच त्यांना फोन न दिल्यास ते चिडचीड करतात आणि रडतात.
  • परंतु याच सवयीपासून पालकांनी दूर असणे गरजेचे आहे. अन्यथा पालकांनाच याचा भुर्दंड भरावा लागणार आहे.

Cyber Crime : लंडन: अनेक पालकांची इच्छा असते की आपल्या लहान मुलांनी स्मार्टफोन वापरू नये. जितके शक्य असल्याने पालक आपल्या मुलांना फोनपासून दूर ठेवतात. परंतु पालकांकडील असेलेला मोबाईल लहान मुले वापरतातच. तसेच त्यांना फोन न दिल्यास ते चिडचीड करतात आणि रडतात. त्यामुळे अनेक वेळेला नाईलाजाने पालक आपल्या मुलांकडे फोन देतात. परंतु याच सवयीपासून पालकांनी दूर असणे गरजेचे आहे. अन्यथा पालकांनाच याचा भुर्दंड भरावा लागणार आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. 

मुलांकडे फोन देण पडू शकतं महाग

जर आपल्या मुलांकडे फोन देण्याची तुमची सवय असेल तर तुम्हाला ही सवय महाग पडू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की असा कायदा आला आहे की काय तर तसे नाही. सध्या अँड्रॉईडच्या गुगल पे स्टोअरवर अनेक मोफत ऍप्स उपलब्ध आहेत. असे अनेक ऍप तुमच्या मोबाईलमधील माहिती चोरतात आणि तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या लहान मुलाकडे फोन दिला आणि त्याने खेळण्याच्या नादात आईचे चांगलेच आर्थिक नुकसान केले. 


इंग्लंडमधील घटना


इंग्लंडमध्ये राहणार्‍या सारा ब्रुस या महिलेला दोन मुले आहेत. सारा यांचा मुलगा त्यांच्या मोबाईलवर युट्युबरवर व्हिडीओ बघत होता. तेव्हा स्क्रीनवर Epic Slime – Fancy ASMR Slime Game Sim नावाच्या गेमची एक जाहिरात पॉप अप झाली. मुलाने आपल्या आईकडे हा गेम डाऊनलोड करण्याची परवानगी मागितली. हा गेम फ्री असावा असे साराला वाटले आणि त्यांनी हा गेम डाऊनलोड करण्याची परवानगी दिली. 


हजारो रुपयांचा चुना 

मुलाने हा गेम डाऊनलोड केला आणि खेळू लागला. नंतर मोबाईलवर बँकेचा एक मेसेज आला. त्यात साराच्या बँक खात्यातून १०९.९ पाऊंड  म्हणजेच भारतीय रुपयांत १० हजार रुपये कट झाले होते. इतकेच नाही तर सबस्क्रिप्शनच्या नावाने पुन्हा साराच्या खात्यातून ६८.८९ पाऊंड म्हणजे सहा हजार ६०० रुपये कट झाले होते. जेव्हा साराने गुगलशी याबाबत संपर्क साधला तेव्हा पैसे परत मिळवण्यासाठी कुठलीच पॉलिसी आपल्याकडे नसल्याचे गुगलने स्पष्ट केले. 
नंतर साराने अनेक प्रयत्न केल्यानंतर तिला थोडीफार रक्कम मिळाली, परंतु संपूर्ण पैसे तिला काही मिळाले नाही. लहान मुलांना मोबाईल देणे किती महागात पडू शकते याचे हे उदाहरण आहे. यासाठी मोबाईलमधील माहिती जपून ठेवावी तसेच अस ऍप डाऊनलोड करताना काळजी घ्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी