Petrol Disel : पेट्रोल डिझेलवरील कराच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल, सर्वाधिक महसूल महाराष्ट्राच्या तिजोरीत

Government Has Collected More Than 6 Lakh Crore Tax सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमती चांगल्याच वाढल्या आहेत. केंद्र सरकारने जरी कर कमी केला असला तरी किंमत थोड्या फार प्रमाणात कमी झाल्या आहेत. सरकरने पेट्रोल डिझेलवरील कराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळवले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्समुळे ६.५८ लाख कोटी रुपये महसूल  जमा झाले आहे. त्यापैकी केंद्राच्या तिजोरीत ४.५५ लाख कोटी आणि राज्याच्या तिजोरीत २.०२ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.

petrol diesel
पेट्रोल डिझेल 
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल डिझेलच्या किंमती चांगल्याच वाढल्या आहेत.
  • केंद्र सरकारने जरी कर कमी केला असला तरी किंमत थोड्या फार प्रमाणात कमी झाल्या आहेत.
  • सरकरने पेट्रोल डिझेलवरील कराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळवले आहे.

Petrol Disel : नवी  दिल्ली : सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमती चांगल्याच वाढल्या आहेत. केंद्र सरकारने जरी कर कमी केला असला तरी किंमत थोड्या फार प्रमाणात कमी झाल्या आहेत. सरकरने पेट्रोल डिझेलवरील कराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळवले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्समुळे ६.५८ लाख कोटी रुपये महसूल  जमा झाले आहे. त्यापैकी केंद्राच्या तिजोरीत ४.५५ लाख कोटी आणि राज्याच्या तिजोरीत २.०२ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. 

पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती 


केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेत ही माहिती दिली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील कर आणि सेसच्या रुपात ४.५५ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. राज्यसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नात त्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्सच्या माध्यमातून २.०२ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. 

सर्वाधिक महसूल महाराष्ट्राच्या तिजोरीत 


केंद्रीय मंत्री तेली यांनी संसदेत माहिती दिली की पेट्रोलियम उत्पादनच्या विक्रीतून कर आणि वॅटच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे महाराष्ट्राला मिळाला आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीत पेट्रोलियम उत्पादनाच्या विक्रीतून कर आणि सेसच्या माध्यमातून २५ हजार ४३० कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशमला २१ हजार ९५६ कोटी तर तमिळनाडूला १७ हजार ६३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील ५ आणि १० रुपये कमी केले होते. त्यानंतरही महागाई कमी झालेली नाही. काही राज्य सरकारांनीसुध्दा पेट्रोलियम पदार्थावर कर कमी केले होते. तरी आज दिल्लीत इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल ९४.४१ रुपये तर डिझेल ८६.६७ रुपये लिटर रुपयांना विकले जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी