आमंत्रण स्विकारताच मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या तालिबानशी चर्चा होते तर पाकिस्तानशी का नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जून रोजी जम्मू-काश्मीर मुद्द्यांवरुन सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी देशातील प्रमुख 14 पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

 mehbuba mufti
मेहबूबा मुफ्ती  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • फारुख अब्दुल्ला यांनी स्विकारले पंतप्रधानांचे आमंत्रण
  • बैठकीचा कोणताही अजेंडा नाही,जे काही बोलायचे ते बोलू शकतात. - युसूफ तारीगामी
  • ज्यांना या बैठकीसाठी पंतप्रधानांकडून आमंत्रण आले, त्या सर्वांनी या बैठकीमध्ये सामील व्हावे - फारुख अब्दुल्ला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जून रोजी जम्मू-काश्मीर मुद्द्यांवरुन सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी देशातील प्रमुख 14 पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. नॅशनल कॉन्फ्रेन्स प्रमुख फारुक अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदींचे आमंत्रण स्वीकारले आहे. मोदींनी आयोजित केलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील गुपकार आघाडीचे बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या बैठकीमध्ये नॅशनल कॉन्फ्रेन्स प्रमुख फारुक अब्दुल्ला म्हणाले की, ज्यांना या बैठकीसाठी पंतप्रधानांकडून आमंत्रण आले, त्या सर्वांनी या बैठकीमध्ये सामील व्हावे.

पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी फारूक अब्दुल्ला यांच्या घरी गुपकार आघाडीची बैठक झाली. दरम्यान, यामध्ये पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी मोठे विधान केले आहे. 'गेल्या दिवशी सरकार तालिबानांशी बोलत होते. जर सरकार तालिबानांशी बोलू शकतो तर पाकिस्तान का नाही? असा सवाल त्यांनी योवळी उपस्थित केला. जनतेच्या हितासाठी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यांशीही बोलायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदी यांची 24 जून रोजी होणार्‍या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील राजकीय गतिरोधासह केंद्र शासित प्रदेशाला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या विषयावरदेखील चर्चा केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणे अपेक्षित आहे. फारूक अब्दुल्ला यांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये गुपकर आघाडीचे प्रवक्ते युसूफ तारीगामी म्हणाले की, जम्मू-काश्मीर मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदी आण‍ि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली जाईल. या बैठकीचा कोणताही अजेंडा नसून ज्यांना जे काही बोलायचे ते बोलू शकतात. आम्ही आपल्याला खात्री देतो की, आम्ही काही आकाशातील तारे मागणार नसून आमचे जे काही होते तेच फक्त आमच्याजवळ असायला हवे असे आमचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले.

बैठकीत सहा पक्षांतील नेत्यांचा समावेश

फारुक अब्दुल्ला यांच्या घरी झालेल्या गुपकार आघाडीच्या बैठकीमध्ये 6 पक्षांतील नेत्यांचा समावेश होता. ही बैठक नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्षाचे फारुक अब्दुल्ला आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (पीडीपी) मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वात झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव अजय भल्ला, आयबीचे प्रमुख अरविंद कुमार, रॉचे प्रमुख सामंत कुमार गोयल, सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल कुलदीप सिंह आणि जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांचा समावेश होता. या बैठकीपूर्वी शहा यांनी राज्याचे उप राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी मुलाखत केली होती. दरम्यान, या दोन्ही बैठकीला राज्याच्या अतर्गंत विषयाशी महत्वपूर्ण मानले जात आहे.

बैठकीसाठी 14 राजकीय पक्षांना निमंत्रण

या बैठकीसाठी 14 राजकीय पक्षांना निमंत्रण पाठवले असून यामध्ये फारुक अब्दुला आण‍ि पीडीपीच्या अध्यक्ष्या मेहबूबा मुफ्ती यांचादेखील समावेश आहे. पीएमओच्या माहितीनुसार, सर्वपक्षीय नेत्यांना फोनव्दारे कळवण्यात आले असल्याने सांगितले आहे.

केंद्राने ऑगस्ट 2019 मध्ये हटवले कलम 370

केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले होते. त्यावेळी राज्याला दोन भागात म्हणजेच जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विभागले गेले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी