OTT ओटीटीवरील अश्लील कंटेटवर अनुराग ठाकुर म्हणाले, 'रचनेच्या नावाखाली गैरवर्तणूक आणि असभ्यपणा सहन केला जाणार नाही'

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 20, 2023 | 12:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Abuse and Rudeness on OTT:ओटीटीवरील अश्लील कंटेटच्या वाढत्या तक्रारींबाबत केंद्र सरकार गंभीर असून, यासंबंधी काही नियम बदलण्याची गरज पडल्यास सरकार ते करण्यासाठी मागे हटणार नाही. असे वक्तव्य केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. 

सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माध्यम जगताला देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कथानकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन
  • 'मातृभूमी' सारख्या संस्थांना अशा बनावट कथा आणि भारतविरोधी आवाज उठवणाऱ्याविरुद्ध प्रभावी यंत्रणा विकसित करण्याचे आवाहन
  • ठाकूर म्हणाले, “आपल्याला नावीन्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली काहीही स्वीकारणे टाळावे लागेल. काही विदेशी प्रकाशन कंपन्या ह्या भारताविरुद्ध उद्दिष्ट बाळगून कार्य करत आहेत, जे वेळीच ओळखता आले पाहिजे.

Abuse and Rudeness on OTT: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यम जगताला देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कथानकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काल रविवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी ओटीटीवरील कंटेंटबद्दल निर्माण झालेल्या भीतीवर भाष्य केले आणि त्यावर केंद्रसरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लिलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, यासंदर्भात नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज भासल्यास माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्या दिशेने पाऊल टाकणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. 

हे पण वाचा : Influenza H3N2 and Influenza H1N1 : 'ही' लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करा

सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आवश्यकता पडल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी शनिवारी त्यांनी माध्यम कर्मियांना असे आवाहन केले होते की. 'भारताच्या अखंडतेला धोका पोहचवण्याऱ्या अश्लील आणि असभ्य विषयाच्या कथानकाचे आपल्या माध्यमाद्वारे प्रसिद्धी करु नये. आपल्या लोकशाही विरुद्ध देशातून आणि विदेशातून अनेक निराधार, अतार्किक मते काहींनी व्यक्त केली गेली, मात्र आपल्या महान राष्ट्राची लोकशाही अबाधित राहिली आहे.''

हे पण वाचा : ​निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये नक्की करा हे ५ पदार्थ

यासोबतच त्यांनी  'मातृभूमी' सारख्या संस्थांना अशा बनावट कथा आणि भारतविरोधी आवाज उठवणाऱ्याविरुद्ध प्रभावी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे. नव्या टेक्नॉलॉजीचा वापर विकासासाठी केला जातो, समाजात असंतोष पसरवण्यासाठी नाही, यावर जोर देत ते म्हणाले " सोशल मिडियासारख्या पारदर्शकते भीतीच्या मागे लपून विदेशात कोडेड अल्गोरिदमच्या मदतीने डिजिटल साईट चालवल्या जात आहेत, दिवसागणिक त्या चिंतेचा विषय बनत आहेत. 

हे पण वाचा : अंधेरी मेट्रो नजीक परिसरात BMC ची मान्सून पूर्वतयारी

वास्तविक परिस्थिती समजून घेण्याची महत्त्वाची भूमिका भारतीय माध्यमांनी बजावावी 
ठाकूर म्हणाले, “आपल्याला नावीन्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली काहीही स्वीकारणे टाळावे लागेल. काही विदेशी प्रकाशन कंपन्या ह्या भारताविरुद्ध उद्दिष्ट बाळगून कार्य करत आहेत, जे वेळीच ओळखता आले पाहिजे. भारतीय माध्यमाला त्यात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल.

कॉँग्रेस वर साधला निशाणा 
"आजकाल 'लोकशाही' हा शब्द सार्वजनिक ठिकाणी वारंवार ऐकायला मिळतो; ज्यांनी देशाची लोकशाही आणि तिथल्या संस्थांना सातत्याने कमजोर करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्यासाठी शासकीय तत्वे आता केवळ 'फॅशन स्टेटमेंट' बनले आहेत" असे देखील ते पुढे म्हणाले. तसेच उल्लंघन करणारे आता बळी पडल्याचे नाटक करत आहेत, असा कॉँग्रेस वर त्यांनी निशाणा देखील साधला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी