गोरखपूर: उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथे एक वेगळीच घटना घडली आहे. एका महिलेने लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्यातील शारीरिक दोष समोर आल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे आणि त्या नवऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र सार्वजनिक करण्याची मागणी तिने केली आहे. नवऱ्याने आणि त्याच्या कुटुंबाने नवऱ्यातील शारीरिक दोष लपवून फसवल्याचा आरोप त्या नवरीने केला आहे. गोरखपूरच्या रामगढ़ताल पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.
तक्रार करणाऱ्या महिलेचे लग्न १३ फेब्रुवारी २०२१ ला झाले होते. लग्नात सासरकडच्यांनी खूप हूंडा मागितला आणि माहेरच्यांना तो द्यावा लागला. लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने जवळ येऊ दिले नाही. त्यावेळी तिच्या लक्षात आले की तो शारीरिकदृष्ट्या कमजोर आहे. तिला वाटले की हा दोष उपचारानंतर बरा होईल म्हणून ता त्यावेळी शांत बसली. परंतु, असे झाले नाही म्हणून पोलिसांत तक्रार केली.
थोड्या वेळाने तिला कळाले की गेले सात वर्ष नवऱ्यावर उपचार सुरू आहेत. परंतु, तो अजून बरा झाला नाही आणि आता नीट होण्याच्या शक्यताही कमी आहेत. नवऱ्यातील हा दोष लपवून सासरच्यांनी माझे आयुष्य उध्वस्त केले असे ती म्हणते. इतकेच नाही तर याबाबत तिने कोणाला सांगितल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकीही दिली.
त्या महिलेने तक्रारीत सांगितले की, सासरच्यांनी नवऱ्याचा दोष निघून जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु, तसे झाले नाही. नंतर ते धमकी द्यायला लागले आणि भीती घालायला लागले तेव्हा त्या महिलेने पोलिसांचा आधार घेत तक्रार नोंदवली. पोलीस पुढील तपास करत आहेत. तपासानुसार त्या मुलावर आणि त्याच्या कुटुंबावर कारवाई केली जाईल.