ग्रुप SEX साठी तिघेजण करत होते ब्लॅकमेल, तरुणीने केलं 'असं' काही...

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 12, 2019 | 17:47 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Girl blackmailed for Group Sex: एका कॉलेज तरुणीला ग्रुप सेक्ससाठी तीन तरुण ब्लॅकमेल करत असल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने आत्महत्या केली आहे.

group sex college girl blackmail suicide gujarat crime news
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • ग्रुप सेक्ससाठी तरुणीला ब्लॅकमेल
  • तीन तरुण वारंवार करत होते ब्लॅकमेल
  • कंटाळून तरुणीने स्वत:ला पेटवलं

राजकोट: गुजरातमधील राजकोट येथे एका २० वर्षीय तरुणीने स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. काही तरुणांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुणीने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. मोरबी जिल्ह्यातील पेडक सोसायटीत तीन तरुण ग्रुप सेक्स करण्यासाठी पीडित तरुणीला वारंवार ब्लॅकमेल करत होते. तरुणांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना शुक्रवारी अटक केली आहे.

पीडित तरुणीने गुरुवारी सकाळी हे धक्कादायक पाऊल उचललं. पीडित तरुणी कॉलेजची विद्यार्थीनी होती. गुरुवारी सकाळी तिने स्वत:ला पेटवून घेतलं. आगीमध्ये होरपळलेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीला तिघे जण मिळून ग्रुप सेक्स करण्यासाठी वारंवार फोर्स करत होते. तसेच ब्लॅकमेलही करत होते. या तरुणांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित तरुणीने आत्महत्येचं पाऊल उचललं. 

या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली आहे. आरोपींमध्ये जितेंद्र मकवाना, राहुल वोरा, अखिल परमार आणि गौरी उभाडिया यांचा समावेश आहे. पीडित तरुणीने मृत्युपूर्वी आपण सुसाइड नोट लिहिल्याचं पोलिसांना सांगितलं. सुसाइड नोटमध्ये पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार लिहिला होता. यामध्ये पीडित तरुणीने मकवाना याच्यावर आरोप करत म्हटलं होतं की, त्याने किस करताना एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करत होता. ब्लॅकमेल करताना त्याने पीडित तरुणीला ग्रुप सेक्स करण्यासाठी फोर्स केल्याचंही सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. या सर्व प्रकरणात गौरी उभाडिया ही आरोपींना मदत करत होती.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल आणि उभाडिया या दोघांना अटक केली आहे तर इतरही आरोपींचा शोध सुरु आहे. पीडित तरुणी ही १२वीचं शिक्षण घेत होती तर तिचे आई आणि वडील बांधकामात मजुरी करतात. आपले आई-वडील घरी नसताना पीडित तरुणीने आत्महत्या केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी