Sex scandal in Tamil Nadu: धक्कादायक, शाळेतील शिक्षिका आणि तिच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप सेक्सचा व्हिडिओ व्हायरल; चौकशी सुरू

हा व्हिडिओ पैशांसाठी आंतरराष्ट्रीय अश्लील साइटवर अपलोड करण्यात आला होता की काही लोकांमध्ये तो प्रसारित करण्यात आला होता, याचा तपास सायबर सेल करत आहे.

Group sex video involving female teacher and  her minor students goes viral Sex scandal in Tamil Nadu
तामिळनाडू सायबर सेलने एका शाळेतील महिला शिक्षिका आणि तिच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या सामूहिक सेक्स व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तामिळनाडू सायबर सेलने एका शाळेतील महिला शिक्षिका आणि तिच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या सामूहिक सेक्स व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे.
  • विद्यार्थी शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य
  • शिक्षिका आणि तिचा बॉयफ्रेंड सेक्स स्कँडलमध्ये सामील

चेन्नई : तामिळनाडूमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षिकेने तिच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांसोबत सामूहिक सेक्सचा व्हिडिओ काढल्याची धक्कादायक घटना घडली. हा व्हिडिओ शेअर झाल्याने खळबळ उडाली आहे.  (Group sex video involving female teacher and  her minor students goes viral Sex scandal in Tamil Nadu)

सायबर सेलने एका शाळेतील महिला शिक्षिका आणि तिच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या सामूहिक सेक्स व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे. एका व्यावसायिकाने चित्रित केलेला व्हिडिओ, जो महिलेचा प्रियकर होता, त्याच्या काही मित्रांनी शेअर केला होता.

हा व्हिडिओ पैशांसाठी आंतरराष्ट्रीय अश्लील साइटवर अपलोड करण्यात आला होता की काही लोकांमध्ये तो प्रसारित करण्यात आला होता, याचा तपास सायबर सेल करत आहे.

मदुराई येथील सरकारी शाळेतील ४२ वर्षीय शिक्षिका आणि तिच्या ३९ वर्षीय प्रियकराला रविवारी अटक करण्यात आली असून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.

मदुराई सायबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीजीपीच्या कार्यालयाकडून पोर्नोग्राफिक सामग्री शेअर करणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यासाठी कठोर सूचना देण्यात आल्या आहेत.

पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचे 2010 पासून एका व्यावसायिकासोबत अवैध संबंध होते. शिक्षिकेने 16 वर्षांच्या तीन मुलांना तिच्या घरी आणले, त्या गोड बोलून त्यांच्यासोबत लैंगिक चाळे करू लागली. हे करत असतानाचा व्हिडिओ तिच्या प्रियकराने शूट केला.  चौकशीदरम्यान, शिक्षिकेच्या व्यावसायिक मित्राने उघड केले की त्याने हा व्हिडिओ त्याच्या काही मित्रांमध्ये प्रसारित केला होता. यामुळे सायबर सेलने व्हिडिओ प्राप्त झालेल्या काही लोकांची चौकशी केली.

अल्पवयीन मुलांनी तिच्या विरोधात तक्रार केल्यानंतर मदुराई दक्षिण ऑल वुमन पोलीस स्टेशनने महिला आणि तिच्या बॉय फ्रेंडविरुद्ध आधीच गुन्हा दाखल केला आहे.

या दोघांवर पोक्सो कायद्याच्या कलम ५(१), ५(एन) आर/डब्ल्यू ६, आयपीसीच्या कलम २९२(ए), ५०६ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ (ए) आणि ६७ (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, अश्लील मजकूर प्रसारित करणे तसेच गुन्हेगारी धमकी देणे असे आरोप लावण्यात आला आहे. 

सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते व्हिडिओ ज्यांनी प्रसारित केले त्यांची चौकशी करत असून गरज पडल्यास अटक केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी