Gujarat Election Result: मोरबीत भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकला, पूल दुर्घटनेनंतरही कसा झाला विजय? वाचा

BJP wins morbi assembly seat: गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणुकीपूर्वी गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या निवडणुकीत कोण बाजी मारतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय
  • पूल दुर्घटना झालेल्या मोरबीत भाजप उमेदवाराने विजय मिळवला
  • या दुर्घटनेत 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता मात्र, तरिही भाजप उमेदवार विजयी झाला कसा?

Morbi assembly election seat: गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल आले आहेत. सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे मोरबी विधानसभा क्षेत्रातील आहे. मोरबी विधानसभेच्या जागेवर भाजप उमेदवार कांतिलाल अमृतिया यांनी विजय मिळवला. (Gujarat Assembly election 2022 result bjp wins morbi seat even after a bridge collapsed incident read details in marathi)

गुजरात विधानसभा निवडणूक : भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होणार​

मोरबीत कोणत्या उमेदवाराला किती मते?

मोरबी विधानसभेच्या जागेवर भाजप उमेदवार कांतिलाल अमृतिया यांनी तब्बल 62079 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कांतिलाल अमृतिया यांना 114538 इतकी मते मिळाली आहेत. काँग्रेसचे उमेदवार जयंतिलाल जेराजभाई पटेल यांना 52459 मते मिळाली आहेत. तर आम आदमी पार्टीचे उमेदवार पंकज राणसरिया हे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले.

  1. कांतिलाल अमृतिया (भाजप) - 114538 मते
  2. जयंतिलाल जेराजभाई पटेल (काँग्रेस) - 52459 मते
  3. पंकज राणसरिया (आम आदमी पार्टी) - 17544 मते 

हे पण वाचा : तिशीनंतर प्रेग्नेंट होण्यासाठी सोप्या टिप्स

मोरबीची जागा का बनली चर्चेची?

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी मोरबी येथील नदीवरील एक पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मोरबीची जागा चर्चेचा विषय बनली होती.

हे पण वाचा : हिप्सला मॉडेल सारखा शेप देण्यासाठी 6 सोप्या टिप्स

भाजपने कसा मिळवला विजय?

मोरबी पूल दुर्घटनेनंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस सुद्धा केली होती. यासोबतच निवडणुकीवेळी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची फौज प्रचारासाठी मैदानात उतरली होती. भाजपचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मोरबीत जाहीर सभा घेतल्या होत्या. तसेच भाजपने येथील स्थानिक आमदाराचा पत्ता कट करुन त्या जागेवर कांतिलाल अमृतिया यांना उमेदवारी दिली होती. कांतिलाल अमृतिया यांनी मोरबी दुर्घटनेवेळी स्वत: नदीत उडी घेत बचावकार्यात मदत केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी