अपघातात त्याने गमावले होते दोन हात, एक पाय, तरीही १२वीत मिळवले ९२ टक्के  

Shivam Solanki Success Story: १२वीच्या परीक्षेत शिवम सोलंकी याने ९२ टक्के मार्क्स मिळवत सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. 

gujarat boy lost hands in accident but still scored 92 percent in class 12 exam
अपघातात त्याने गमावले होते दोन हात, एक पाय, तरीही १२वीत मिळवले ९२ टक्के   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • शिवम सोलंकीच्या जिद्दीची कहाणी 
  • शुभमने अपघातात गमावले होते आपले दोन्ही हात आणि एक पाय 
  • १२वीच्या परीक्षेत शुभमने मिळवले ९२ टक्के मार्क्स

गुजरात: इच्छा शक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आपण संकटावर मात करुन विजय मिळवू शकतो. हे सिद्ध करुन दाखवलं आहे गुजरातमधील शिवम सोलंकी या विद्यार्थ्याने. शिवम सोलंकी याने १२वीच्या परीक्षेत ९२ टक्के मार्क्स मिळवत उत्तीर्ण होत आपलं आणि परिवाराचं नाव मोठं केलं आहे. शिवम याने वयाच्या १२व्या वर्षी एका अपघातात आपले दोन्ही हात आणि एक पाय गमावला होता. मात्र, त्याने खचून न जाता आपलं आयुष्य सुरूच ठेवलं आणि त्याचा परिणाम आज सर्वांच्या समोर आदर्श 
ठेवत आहे.

गुजरातमधील १२वीच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलेल्या शिवम सोलंकी याने राज्याच्या बोर्डाच्या परीक्षेत ९२ टक्के मार्क्स मिळवले आहेत. शिवमचे वडिल वडोदरा महानगरपालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. शिवम याचा हायपरटेन्शन तारेसोबत संपर्क आला आणि त्याच्यासोबत मोठा अपघात घडला होता. या अपघातात शिवम याने आपले दोन्ही हात आणि एक पाय गमावला होता. मात्र, असे असले तरीही त्याने आपल्या आयुष्यात हार मानली नाही.

शिवम याने बारावीच्या परीक्षेत आपलं कर्तुत्व सिद्ध केलं आहे आणि त्याला हे सुद्धा माहिती आहे की, शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीला मदत करणे हे समाजातील एक महत्वाचे कार्य आहे आणि म्हणूनच त्याने डॉक्टर बनण्याचे ठरवले आहे.

एएनआयसोबत बोलताना शिवमने सांगितले की, "मला डॉक्टर बनायचं आहे, जर असं होऊ शकल नाही तर इतर कोणत्याही सेवांमध्ये सहभागी होऊन लोकांची सेवा करायला मला आवडेल. मी परीक्षेच्या आधी दिवसभर अभ्यास केला. शिक्षकांनी माझ्या अभ्यासात सुधारणा केली आणि त्यामुळेच मला ९२.३३ टक्के मार्क्स मिळाले".
'ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत त्यांना मला एक मेसेज द्यायचा आहे, जेणेकरुन भविष्यात त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी परीश्रम घ्यावेत. शिवमने कमी मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहित केले जेणेकरुन ते मेहनत करुन भविष्यात चांगले काम करतील'.

शिवम हा १२ वर्षांचा असातना हाय व्होल्टेज तारांना त्यांनी चुकून स्पर्श केला होता आणि त्या अपघातात त्याला आपले दोन हात आणि एक पाय गमवावा लागला होता. शुभमने यापूर्वी १०वीच्या परीक्षेत सुद्धा ८१ टक्के मार्क्स मिळवले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी