Gujarat Election Exit poll: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोल्स जाहीर करण्यात आले आहेत. विविध चॅनल्स आणि एजन्सीने जाहीर केलेल्या एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ ETG च्या एक्झिट पोलनुसार भाजप सर्वाधिक जागा मिळवत गुजरातमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Gujarat election exit poll 2022 times now egt prediction poll of polls show bjp will regain power read details in marathi)
हे पण वाचा : या सवयींमुळे होऊ शकतो मूळव्याध, आजच बदला अन्यथा...
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आम आदमी पार्टी अशी तीन पक्षांत लढाई आहे. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. आता या निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले असून त्यानुसार भाजप सत्तेत कायम राहणार असल्याचं दिसत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबर जाहीर होतील मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर झाली आहे.
हे पण वाचा : नववर्षात शनीदेव बनवणार शश राजयोग, या राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार
टाइम्स नाऊ ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 139 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. काँग्रेसच्या जागा कमी होऊन 24 ते 34 पर्यंत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पक्षाला 6 ते 16 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सौराष्ट्र - कच्छ क्षेत्रात भाजपला 34 ते 40 जागा मिळताना दिसून येत आहेत. दर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसला एक्झिट पोलनुसार या भागात 8 ते 11 जागा मिळताना दिसत आहेत.
हे पण वाचा : चपातीवर तूप लावून खाण्याचे असंख्य फायदे
हे पण वाचा : स्वप्नात स्त्रीचे असे रूप दिसणे म्हणजे नशीब बदलण्याचे आहे लक्षण
#NavBharatKaExitPoll: POLL OF POLLS के मुताबिक गुजरात में किसे कितनी सीटें?#BJP: 135 — Times Now Navbharat (@TNNavbharat) December 5, 2022
कांग्रेस: 34#AAP: 10
अन्य: 3
देखिए, #Gujarat का सबसे सटीक #ExitPoll LIVEhttps://t.co/bwVMM5LqiD@navikakumar @ETG_Research #ExitPolls #JanGanKaMann #GujaratElections2022 pic.twitter.com/1qclVs5Szy