Gujarat Fishermen Missing : गीर सोमनाथच्या समुद्रात वादळामुळे 15 बोटी बुडाल्या, 8 ते 10 मच्छिमार बेपत्ता

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 02, 2021 | 12:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

कालपासून महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातच्या (Gujarat) किनारी भागात सतत पाऊस (Rain) पडत आहे आणि IMD नुसार येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. गुजरातमध्ये खराब हवामान (Bad weather) आणि (havy rain) मुसळधार पावसामुळे समुद्रात 13-15 बोटी बुडाल्या, अनेक (Fishermen) मच्छीमार बेपत्ता झाले आहेत.

Gujarat Fishermen Missing: 15 boats sank in storm at Gir Somnath, 8 to 10 missing in Gujarat
Gujarat Fishermen Missing : गीर सोमनाथच्या समुद्रात वादळामुळे 15 बोटी बुडाल्या, गुजरातमधील 8 ते 10 जण बेपत्ता   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गिर सोमनाथ समुद्रात वादळामुळे 15 बोटी बुडाल्या
  • गुजरातमधील 8 ते 10 मच्छिमार बेपत्ता
  • येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Gujarat Fishermen Missing मुंबई : गुजरातमधील (Gujarat) गीर सोमनाथमध्ये (Gir Somnath) काल रात्री सतत पाऊस (Rain) आणि जोरदार वाऱ्यामुळे (Strong winds) 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाण्याची भीती आहे. या बोटीत अनेक (Fishermen) मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीतील 8 ते 10 मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत. कालपासून बिघडलेले हवामान पाहता, हवाई विभागाने (Department of Aviation) मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता. (Gujarat Fishermen Missing: 15 boats sank in storm at Gir Somnath, 8 to 10 missing in Gujarat)

जवाद’ चक्रीवादळाची छाया

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासून सतत पाऊस पडत आहे आणि IMD नुसार येत्या ४८ तासात येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच मच्छीमारांसाठी ५ दिवसांचा इशाराही देण्यात आला आहे. त्याचवेळी ओडिशा आणि आंध्रवर ‘जवाद’ चक्रीवादळाची (cyclone jawad) छाया पसरली आहे. अहमदाबादमध्ये आयएमडीच्या प्रादेशिक संचालक मनोरमा मोहंती म्हणाले होते की गुजरातमध्ये 30 नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होईल. यासोबतच 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उत्तर आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


या राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो

भारतीय हवामान विभागाने सांगितले की, 1 ते 2 डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, आज 2 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी