Gujarat: गुजरातच्या भाजप सरकारमधील मंत्र्यावर बलात्काराचा आरोप

Gujarat BJP Minister: माजी सरपंचाने आरोप केला आहे की, मंत्र्याने माझ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या पॉवरचा वापर केला आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

gujarat government minister accused of raping and illegally taking hostage with woman
गुजरातच्या भाजप सरकारमधील मंत्र्यावर बलात्काराचा आरोप  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • गुजरातच्या मंत्र्यावर बलात्कार केल्याचा आरोप
  • 2015 ते 2021 या काळात मंत्र्याने महिलेवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप
  • टीएमसीने केंद्र सरकारव जोरदार हल्ला, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न केले उपस्थित

Rape Case: गांधीनगर: गुजरात सरकारचे ग्रामविकास मंत्री आणि मेहमेदावाडचे भाजप आमदार अर्जुन सिंह चौहान यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि अवैधरित्या ओलीस ठेवल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. बुधवारी हलदरवास गावच्या माजी सरपंचाने डीएसपींना एक अर्ज सादर केला, ज्यामध्ये विद्यमान ग्रामविकास मंत्री अर्जुन सिंह चौहान यांनी आपल्या पत्नीला बेकायदेशीरपणे कैदेत ठेवले आणि तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला. (gujarat government minister accused of raping and illegally taking hostage with woman)

गुजरातच्या मंत्र्यावर महिलेवर बलात्कार आणि बेकायदेशीरपणे ओलीस ठेवल्याचा आरोप

मंत्र्याने आपल्या अधिकाराचा वापर करून माझ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असा आरोप माजी सरपंचाने केला आहे. फिर्यादीने पुढे दावा केला की, मंत्र्याच्या भीतीने पत्नीने आपलं घर सोडले.

अधिक वाचा: मराठी अभिनेत्रीशी लग्नासाठी फसवणूक करणाऱ्या माजी नगरसेवकाला हायकोर्टाचा दणका

सोबतच असा आरोप केला आहे की, 'अर्जुन सिंगने २०१५ ते २०२१ दरम्यान माझ्या पत्नीवर बलात्कार केला आहे. कोव्हिडमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी माझ्या पत्नीला दीड महिना कुठेतरी कोंडून ठेवले होते.' त्याने पुढे सांगितले की, 'अर्जुन सिंगने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.' 

दरम्यान, खेडाचे एसएसपी म्हणाले की, 'महेमदाबाद तालुक्यातील हलदरवास गावात राहणाऱ्या एका व्यक्तीकडून आम्हाला तक्रार मिळाली आहे. पोलीस आधी बलात्कार आणि अर्जदाराच्या पत्नीला बेकायदेशीर ओलीस ठेवल्याच्या आरोपांची चौकशी करणार आहेत. जर हे आरोप खरे ठरले तर फौजदारी कारवाई केली जाईल'

टीएमसीचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले प्रश्न

दरम्यान, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी गुजरातमधील भाजपच्या मंत्र्यांने महिलेवर केलेल्या कथित बलात्काराचा हवाला देत महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून केंद्रावर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा: Rahul Shewale : शिवसेना खासदार राहुल शेवाळेंविरोधात बलात्काराची तक्रार, पीडित महिलेने लावली सीडी

आरोपांचा संदर्भ देत, टीएमसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, भाजपचे कॅबिनेट मंत्री आणि गुजरातचे आमदार अर्जुन सिंह चौहान यांनी एका महिलेवर बलात्कार आणि बेकायदेशीरपणे कैद केले.

दरम्यान, या प्रकरणी आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री देखील आपल्या मंत्र्यावर काही कारवाई करणार याकडे आता गुजरातमधील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी