अहमदाबाद: Gujarat Hooch tragedy Death toll rises to 28: गुजरातमध्ये (Gujarat) विषारी दारू (Spurious liquor) प्यायल्यामुळे मृतांची संख्या आता 28 वर पोहोचली आहे. तर 47 जणांची चिंताजनक आहे. भावनगर अहमदाबाद (Ahmedabad) येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डीजीपी आशिष भाटिया यांनी माध्यमांसमोर याला दुजोरा दिला आहे. गुजरातमधील बोटाड जिल्ह्यातील रोजिद गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि अहमदाबाद क्राइम ब्रँचही (Ahmedabad Crime Branch) तपासात सहभागी झाले आहेत.
गृह राज्यमंत्री हर्ष संघवी (Harsh Sanghvi) यांनी 24 तासांत मागवला रिपोर्ट
गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी विषारी दारूच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी 24 तासांत अहवाल मागवला आहे. काँग्रेसचे गुजरात अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनीही एका शिष्टमंडळासह रोजिद गावात पीडितांची भेट घेतली.
अधिक वाचा- Watch Video: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, CSMT ला लोकलचा डब्बा रूळावरून घसरला
तपासासाठी एसआयटी स्थापन
भावनगर रेंजचे आयजी अशोक यादव यांनी या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आहे. त्याचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक करणार आहेत.
पोलिसांकडून तीन दारू तस्करांना अटक
पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पुढे सांगितलं की, गरज पडल्यास पोलीस हत्येचा आरोपही लावतील. आरोपींना पकडण्यासाठी गुजरात एटीएस तसेच अहमदाबाद गुन्हे शाखा आमच्या तपासात सहभागी झाल्या आहेत.
47 जणांची प्रकृती गंभीर
विषारी दारू प्यायल्यांपैकी 47 जणांची प्रकृती गंभीर आहे. बरवालामध्ये दाखल झालेल्या लोकांना भावनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. भावनगरहून बरवाला येथे पोहोचलेले पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी इतर पोलीस अधिकारी तसेच रुग्णवाहिका आदींना सोबत घेतले. बरवालाच्या रुग्णालयात दाखल असलेल्यांना रात्रीच भावनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.