लज्जास्पद! कॉलेजच्या विद्यार्थीनींची मासिक पाळी चेक करण्यासाठी ६८ जणींचे उतरवले कपडे, अंतर्वस्त्र 

Gujarat News: गुजरातच्या भूज जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये समाजाला शरमेने मान खाली घालविणारी घटना घडली आहे. येथील विद्यार्थीनींना मासिक पाळी नाही ना याचा पुरावा देण्यासाठी त्यांना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडले. 

gujarat news girl students asked to remove underwears to prove they are not in periods crime news in marathi tcri 1
लज्जास्पद! कॉलेजच्या विद्यार्थीनींची मासिक पाळी चेक करण्यासाठी ६८ जणींचे उतरवले कपडे, अंतर्वस्त्र   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली :  गुजरातच्या भूज जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. भूज येथील एका कॉलेजच्या प्रिन्सिपलने कथितपणे विद्यार्थीनींना अत्यंत अपमानजनक गोष्ट करण्यास भाग पाडले. प्रिन्सिपलवर आरोप आहे की त्यांनी मासिक पाळी असलेल्या विद्यार्थीनींना कॉलेजच्या परिसरात कोणाला शिवू नये असे सांगितले होते. अशा विद्यार्थीनी एक दुसऱ्यांशी बोलू शकत नाही, तसेच एकमेकांना स्पर्श करू शकत नाही. 

कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या या अजब आदेशावर लोकांनी संताप व्यक्त केला. आता प्रिन्सिपलच्या विरोधात लोक समोर येत आहे. आरोप आहे की प्रिन्सिपल शिवाय कॉलेजच्या इतर स्टाफ मिळून अनेक विद्यार्थीनींसोबत अपमानजनक व्यवहार केला. तसेच आरोप आहे की विद्यार्थीनींना जबरदस्ती पळायला लावले होते. त्यानंतर त्यांचे अंतर्वस्त्र उतरविण्यास सांगितले होते. त्याद्वारे सिद्ध होणार होते की त्यांना मासिक पाळी आहे की नाही. 

अहमदाबाद मिररने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार भूजच्या या कॉलेजच्या या प्रकारच्या वागणुकीमुळे शिक्षण संस्थांच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विद्यार्थीनींना किचन आणि मंदिरापासून दूर ठेवण्यात येत आहे. 

हे आहे संपूर्ण प्रकरण 

सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले होते. त्यावेळी प्रिन्सिलपलला माहिती मिळाली की मासिक पाळीत असताना विद्यार्थीनी किचन आणि मंदिरात प्रवेशक करत आहे. यावर बंदी आहे. यानंतर प्रिन्सिपलने आपल्या स्टाफला घेऊन विद्यार्थीनींना वॉशरूममध्ये बोलावले आणि आपले अंतर्वस्त्र उतारण्यास सांगितले आणि आपल्याला मासिक पाळी नाही हे सिद्ध करायला सांगितले. 

जेव्हा विद्यार्थीनींनी विरोध केला तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या वॉर्डनने सांगितले की, त्यांच्या विरूद्ध कोर्टात जाऊ शकतात पण अट ही आहे की त्यांना शाळेचे हॉस्टेल सोडावे लागेल. तसेच डिक्लरेशन फॉर्मवर सही करावी लागेल की त्यात लिहिले आहे की त्यांच्यासोबत काहीच वाईट झाले नाही. काही कॉलेजच्या स्टाफने विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना पोलिसात न जाण्याची धमकी पण दिली. 

कॉलेजच्या डीनचे बेजबाबदार वक्तव्य 

या घटनेबाबत कॉलेजच्या डीनने खूप बेजबाबदार वक्तव्य केले आहे. कॉलेजच्या डीन दर्शना ढोलकिया यांनी संपूर्ण प्रकरणावर म्हटले की हे प्रकरण हॉस्टेलचे आहे त्यामुळे याबाबत विद्यापीठ आणि कॉलेज काहीच करू शकत नाही. सर्व काही विद्यार्थीनींच्या परवानगीने झाले आहे. त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आलेली नाही. कोणीही त्यांना टच केले नाही. तरीही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...