गुजरात विधानसभेची निवडणूक डिसेंबर महिन्यात

gujarat vidhansabha election 2022 date schedule details announced by election commission of india : गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात निवडणूक जाहीर केली आहे.

gujarat vidhansabha election 2022
गुजरात विधानसभेची निवडणूक डिसेंबर महिन्यात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • गुजरात विधानसभेची निवडणूक डिसेंबर महिन्यात
 • दोन टप्प्यात होईल मतदान
 • मतमोजणी डिसेंबर महिन्यात

gujarat vidhansabha election 2022 date schedule details announced by election commission of india : गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात निवडणूक जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 1 डिसेंबर 2022 तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. मतमोजणी 8 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 10 डिसेंर 2022 रोजी पूर्ण केली जाईल.

Bridge Collapse: 'हे' आहेत भारतातील सर्वात भयानक पूल दुर्घटना

Washington Square Shocking Fact : या प्रसिद्ध उद्यानाखाली पुरलेले आहेत 20 हजारांहून अधिक मृतदेह...जगातील भुताटकीच्या जागांमध्ये समावेश

गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक

 1. पहिल्या टप्प्याची अधिसूचना 5 नोव्हेंबर 2022
 2. दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना 10 नोव्हेंबर 2022
 3. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस 14 नोव्हेंबर 2022
 4. पहिल्या टप्प्यातील अर्जांची छाननी 15 नोव्हेंबर 2022
 5. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 17 नोव्हेंबर 2022
 6. दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस 17 नोव्हेंबर 2022
 7. दुसऱ्या टप्प्यातील अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर 2022
 8. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 21 नोव्हेंबर 2022
 9. पहिल्या टप्प्याचे मतदान 1 डिसेंबर 2022
 10. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर 2022
 11. मतमोजणी 8 डिसेंबर 2022

4.9 कोटी पात्र असलेले नोंदणीकृत मतदार

गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 89 जागांसाठी 1 डिसेंबर 2022 आणि 93 जागांकरिता 5 डिसेंबर 2022 रोजी मतदान होईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये 4.9 कोटी पात्र असलेले नोंदणीकृत मतदार आहेत. यातील 4.04 लाख दिव्यांग मतदार आहेत. 9.8 लाख ज्येष्ठ नागरिक तर 4.61 लाख तरुण मतदार आहेत. 

मतदान केंद्र

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 51 हजार 782 मतदान केंद्र असतील. यापैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाईल. गुजरातच्या शहरांमध्ये 17 हजार 506 तर ग्रामीण भागात 34 हजार 276 मतदान केंद्र असतील. राज्यात 182 मॉडेल पोलिंग बूथ पण असतील.

भाजप-आम आदमी पार्टी यांच्यात टक्कर

गुजरातच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी या दोन पक्षांमध्ये मोठी टक्कर होईल असा अंदाज राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. काँग्रेसच्या तुलनेत आम आदमी पार्टी चांगली कामगिरी करेल आणि भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल, असेही राजकीय अभ्यासक सांगत आहेत. याआधी 2017च्या निवडणुकीत भाजपने 99, काँग्रेसने 77 जागांवर विजय मिळवला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी