Gyanvapi Masjid new video shows Nandi and Wazoo khana in one direction : ज्ञानवापीशी संबंधित जास्तीत जास्त माहिती टाइम्स नाउ नवभारत आपल्यासमोर सादर करत आहे. आता ज्ञानवापीशी संबंधित एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नंदी आणि शिवलिंग एका रांगेत दिसत आहे. नंदीचे मुख ज्या दिशेला आहे त्याच दिशेला वजूखाना दिसत आहे. याच वजूखान्याच्या तळाशी शिवलिंग आढळल्याची माहिती सर्व्हेतून पुढे आल्याचे सांगितले जात आहे.
ज्ञानवापीत तिसऱ्या दिवशी झालेल्या सर्व्हेनुसार वजूखान्याच्या तळाशी शिवलिंग आहे. शिवलिंग आणि वजूखाना यामध्ये एक भिंत आहे. भिंत तोडल्यास आणि ढिगारा हटविल्यास शिवलिंग आणखी सुस्पष्ट दिसेल, असे सर्व्हे टीममधील हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. शिवलिंगाच्या तळाशी तळघर आहे. या तळघरात जाऊन तिथेही तपासणी करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात कोर्टाकडूनच सुनावणीअंती निर्देश दिले जातील.
व्हिडीओ संदर्भात बोलताना हिंदू पक्षाचे वकील विष्णु जैन यांनी सत्य समोर येत असल्याचे सांगितले. तळघरात सर्व्हे केल्यास सत्यावर आणखी प्रकाश पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोर्टाने सर्व्हे रिपोर्ट कोर्टात सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत दिली आहे.