gym owner murder : जिम मालकाची हत्या, ऑफिसमध्ये घुसून केला गोळीबार

gym owner shot dead in east delhi preet vihar : जिम मालकाच्या हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. मारेकऱ्यांनी जिम मालकाच्या ऑफिसमध्ये गोळीबार केला.

gym owner shot dead
जिम मालकाची हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जिम मालकाची हत्या
  • ऑफिसमध्ये घुसून केला गोळीबार
  • अज्ञातांविरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू

gym owner shot dead in east delhi preet vihar : जिम मालकाच्या हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. मारेकऱ्यांनी जिम मालकाच्या ऑफिसमध्ये गोळीबार केला. या हल्ल्यात जिम मालक महेंद्र अग्रवाल यांचा मृत्यू झाला. 

जिम मालक महेंद्र अग्रवाल यांच्यावर तीन जणांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी जिम मालकाच्या ऑफिसमध्ये घुसून धडाधड गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी जिम मालक महेंद्र अग्रवाल यांच्या डोक्यात घुसली. याच गोळीमुळे अग्रवाल यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. 

महेंद्र अग्रवाल 'एनर्जी जिम अँड स्पा' या नावाने राजधानी दिल्लीत अनेक सेंटर चालवतात. अग्रवाल यांच्यारील हल्ल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 

PM मोदींनी दिलं नवीन वर्षाचं गिफ्ट, आता स्मॉल सेविंग्स स्कीमवर मिळणार जास्त व्याज, PPF आणि SSY मध्ये बदल नाही

Gay Husband: पती होता समलैंगिक, पत्नीला बसला धक्का, कोर्टाने दिले हे आदेश 

दिल्लीत प्रीत विहारमधील विकास मार्गावर महेंद्र अग्रवाल यांच्या 'एनर्जी जिम अँड स्पा'चे मुख्यालय आहे. या मुख्यालयात महेंद्र अग्रवाल असताना हल्लेखोर ऑफिसमध्ये आले. त्यांनी महेंद्र अग्रवाल ज्या ठिकाणी होते तिथे जाऊन गोळीबार केला. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञातांविरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी