H5N1 bird flu | कोरोना महामारीनंतर युरोपात 'या' विषाणूचे संकट, इंग्लंड-पोलंडमध्ये वेगाने प्रसार

H5N1 bird flu | ग्लंडने राष्ट्रव्यापी एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा प्रिव्हेन्शन झोन (Avian Influenza Prevention Zone) जाहीर केला आहे. या अंतर्गत पोल्ट्री फार्म आणि कोंबड्यांची देखरेख करणाऱ्या लोकांवर बायोसिक्युरिटीच्या निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Bird Flu
युरोपात बर्ड फ्लू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोरोनातून जग सावरत असतानाच युरोपात (Europe)आता एका नव्या आजाराने डोके वर काढले आहे
  • इंग्लंड (England)मधील एका पोल्ट्री फार्ममध्ये एक अत्याधुनिक एच५ बर्ड फ्लू (H5 bird flu)चे रुग्ण मिळाले
  • पोलंडमध्ये बर्ड फ्लूचा वेगाने प्रसार

H5 bird flu | लंडन : जगभरात मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) संकटाने थैमान घातले आहे. सध्या जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत असली तरी अद्यापदेखील हे संकट पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत युरोपात (Europe)आता एका नव्या आजाराने डोके वर काढले आहे. या नव्या आजाराने इंग्लंडसमोर मोठे संकट निर्माण केले आहे. मध्य इंग्लंड (England)मधील एका पोल्ट्री फार्ममध्ये एक अत्याधुनिक एच५ बर्ड फ्लू (H5 bird flu)चे रुग्ण मिळाले आहेत. देशातील कृषी मंत्रालयाने या प्रकाराला दुजारा दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संक्रमित पक्षी वार्विकशायरमधील अल्सेस्टर जवळील एका पोल्ट्री फार्ममध्ये आढळले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी या पोल्ट्रीमधील सर्वच कोंबड्यांना मारले जाणार आहे. (H5N1 bird flu : After Corona pandemic now Europe faces crisis of bird flu)

इंग्लंडमध्ये बर्ड फ्लू प्रसार

बर्ड फ्लूचे हे संकट अशावेळी समोर आले आहे जेव्हा इंग्लंडने राष्ट्रव्यापी एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा प्रिव्हेन्शन झोन (Avian Influenza Prevention Zone) जाहीर केला आहे. या अंतर्गत पोल्ट्री फार्म आणि कोंबड्यांची देखरेख करणाऱ्या लोकांवर बायोसिक्युरिटीच्या निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याआधी एच५एन१ या विषाणूमुळे उत्तर वेल्स भागात कोंबड्यांना लागण झाली होती. तर पूर्व स्कॉटलंडमध्ये (Scotland)एका ठिकाणी कोंबड्या आणि मध्य इंग्लंडमध्ये एका पक्षी बचाव केंद्रातदेखील एच५एन१ विषाणू आढळला होता.

पोलंडमध्ये बर्ड फ्लूचे संकट 

जागतिक पशू स्वास्थ संघटनेने सोमवारी म्हटले की पोलंडमध्ये (Poland)देखील पोल्ट्री फार्ममध्ये एच५एन१ बर्ड फ्लूच्या प्रसाराची माहिती आली आहे. यामध्ये ६,५०,००० कोंबड्यांचा समावेश आहे. बर्ड फ्लू (Bird Flu) विषाणू मागील काही आठवड्यांपासून युरोपभर पसरतो आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलॅंड्स आणि डेन्मार्कमध्येदेखील बर्ड फ्लूची प्रकरणे समोर येत आहेत. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी बर्ड फ्लूच्या ताज्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्व पोल्ट्री फार्मांना पक्षांना आपल्या घरातच ठेवण्याचा आदेश दिला आहे. संसर्ग झालेले आणि स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या संपर्कापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना या हिवाळ्यात जाळ पेटवण्यासाठी आणि आपल्या पोल्ट्रीला मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशातील कृषी विभागाने ्हटेल आहे की ऑगस्टच्या सुरूवातीपासून आथापर्यत एव्हिएन इन्फ्लूएन्झाची १३० प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोनाच्या संकटातून सावरताना

कोरोना प्रतिबंधक लशीकरणाला जगभर मोठ्या प्रमाणात राबवले जाते आहे. युरोप आणि अमेरिकेत लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकटावर बऱ्यापैकी नियंत्रण करता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच आता बर्ड फ्लूचे नवे संकट उभे राहिले आहे. याआधीही बर्ड फ्लूच्या संकटाने आशियाई देशात खळबळ उडवून दिली होती. मात्र आता कोरोनाच्या संकटाला सर्व जगच तोंड देत असताना नव्याने एखादा संसर्गजन्य आजार जगभर पसरणे हे कोणत्याही देशाला परवडणारे नाही. त्यामुळे युरोपातील सर्वच देश बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तत्परतेने पावले उचलत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी