Pakistan | पाकिस्तानात सवय म्हणून लैंगिक शोषण करणाऱ्याला बनवले जाणार नपुंसक, संसदेचा नवा कायदा

Pakistan | पाकिस्तानच्या संसदेने (Pakistan Parliament) लैंगिक शोषणासंदर्भात एक विधेयक पास केले आहे. या कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण करणाऱ्या दोषीला औषध देऊन नपुंसक (Impotent)बनवले जाणार आहे. देशात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे. जनतेच्या मनातील रोष लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलत संसदेत लैंगिक अत्याचारासंदर्भात हे विधेयक मांडले होते.

Pakistan new Law
पाकिस्तानात लैंगिक अत्याचारासंदर्भात नवा कायदा 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानात लैंगिक अत्याचारासंदर्भात नवा कठोर कायदा
  • लैंगिक अत्याचाराच्या दोषीला नपुंसक बनवले जाणार
  • पाकिस्तान संसदेने पास केले विधेयक

Pakistan | इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) वाढत्या लैंगिक अत्याचारांना (Sexual abuse) रोखण्यासाठी एक कठोर कायदा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या संसदेने (Pakistan Parliament) लैंगिक शोषणासंदर्भात एक विधेयक पास केले आहे. या कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण करणाऱ्या दोषीला औषध देऊन नपुंसक (Impotent)बनवले जाणार आहे. देशात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे. जनतेच्या मनातील रोष लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलत संसदेत लैंगिक अत्याचारासंदर्भात हे विधेयक मांडले होते. संसदेने या विधेयकाला मंजूरी देत त्याचा नवीन कायदा केला आहे. (Habitual molesters will be made impotent in Pakistan, Parliament passes the bill)

संसदेच्या संयुक्त सत्रात विधेयक मंजूर

पंतप्रधान इमरान खान यांच्या कॅबिनेटने अध्यादेशाला मंजूरी दिल्यानंतर आणि राष्ट्रपती आरिफ अल्वीद्वारे यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर पाकिस्तानच्या संसदेत हे विधेयक पास झाले आहे. गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयक २०२१, बुधवारी पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्त सत्रात ३३ इतर विधेयकांसोबत सादर करण्यात आले होते. इतर विधेयकांबरोबरचा हा लैंगिक अत्याचाराशी निगडीत विधेयकदेखील पास झाले आहे. डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या कायद्याअंतर्गत पाकिस्तान दंड संहिता १८६० आणि दंड प्रक्रिया संहिता १८९८ मध्ये सुधारणा होणार आहे.

रासायनिक पद्धतीने करणार नपुंसक

विधेयकानुसार रासायनिक पातळीवर गुन्हेगाराला नपुंसक बनवले जाणे ही अशी प्रक्रिया आहे ज्याला पंतप्रधानांनी बनवलेल्या नियमाद्वारे अधिसूचित करण्यात आले आहे. या कायद्याअंतर्गत दोषींना औषध देऊन नपुंसक बनवले जाणार आहे. अधिसूचित बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कायद्यामध्ये ही तरतूद आहे की घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत पीडितेची तपासणी होईल.

पाकिस्तानात आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण कमी

जमात-ए-इस्लामीचे खासदार मुश्ताक अहमद यांनी या विधेयकाला विरोध केला आणि याला बिगर इस्लामी आणि शरियाच्या विरोधात असल्याचे म्हटले. मुश्ताक अहमद यांनी म्हटले की गुन्हेगारांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली पाहिजे. मात्र शरियामध्ये नपुंसक बनवण्याचा कोणताही उल्लेख नाही. प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार इतरही काही देशांमध्ये या प्रकारची शिक्षा दिली जाते. टीकाकारांच्या मते पाकिस्तानात लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ४ टक्क्यांपेक्षाही कमी खटल्यांमध्ये आरोप सिध्द होतो.

दरम्यान पाकिस्तानातील भ्रष्टाचार किती पसरलेला आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानमधील (Pakistan Viral Video)आहे. अतिशय धक्कादायक हा व्हिडिओ पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. व्हिडिओतील पोलिस कर्मचारी सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो जेल विभागातील कर्मचारी आहे. त्याची सध्याची आर्थिक स्थिती अशी झाली आहे की त्याला रस्त्यावर उभे राहून आपल्या दोन लहान लहान मुलांचा लिलाव करावा लागतो आहे. पोलिस कर्मचाऱ्याचे वरिष्ठ त्याच्या मुलाच्या उपचारासाठी सुट्टी देण्यासाठी लाच मागत होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यासमोर दुसरा पर्याय राहिला नव्हता. हे सर्वच प्रकरण गंभीर आहे. सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या कर्मचाऱ्या प्रश्न सोडवला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी