नवी दिल्ली : दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस All (India Institute of Medical Sciences)(AIIMS) चे सर्व्हरवर हल्ला करणाऱ्या हॅकर्स (Hackers) रॅन्समवेअरने ( Ransomware) क्रिप्टोकरन्सीमध्ये सुमारे 200 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. एम्सचे सर्व्हर सोमवारी सलग सहाव्या दिवशी डाऊन होते. या प्रकरणी एम्स व्यवस्थापनाने संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलय. (Hackers demand Rs 200 crore ransom from AIIMS: including ministers 4 crore patients data )
अधिक वाचा : महाराष्ट्रात सक्तीचे धर्मांतरण सहन केले जाणारं नाही - विखे
दरम्यान हॅकर्सने जवळपास 4 कोटी रुग्णाचा डेटा लीक केला आहे. यात माजी पंतप्रधान, मंत्री, नोकरशहा, न्यायाधीशांसह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीआयपी) डेटा साठवलेला आहे. पोलिसांनी 25 नोव्हेंबरला बळजबरी वसुली, सायबर दहशतवादाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठं हॅकिंग असून दहशतवाद्यांच्या षडयंत्राचा संशय असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एम्स व्यवस्थापनाने एका निवेदनात रॅन्समवेअऱ सायबर हल्ला झाल्याची भिती व्यक्त केली होती, परंतु सुरक्षा यंत्रणांनी अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
अधिक वाचा : मूतखड्यावरील जबरदस्त उपाय, रोज प्या हे 3 प्रकारचे ज्यूस
कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, दिल्ली पोलिसांचा सायबर सेल, एनआयसी व गृह मंत्रालयाचे अधिकारी रॅन्समवेअर अटॅकचा तपास करत आहेत. तपास संस्थांच्या शिफारशींनुसार रुग्णालयातील संगणकावर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. एनआयसी ई-हॉस्पिटल डेटाबेस व ई-हॉस्पिटलसाठी अॅप्लिकेशन सर्व्हर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : मुंबईतील बड्या नेत्याने सोडले ठाकरेंचे शिवबंधन
एनआयसी टीम एम्समधील इतर ई-हॉस्पिटल सर्व्हरच्या व्हायरसला स्कॅन करून त्याची सफाई करत आहे. तूर्त रुग्णालयातील सगळी कामे मॅन्युअल मोडमध्ये केली जात आहेत. संपूर्ण नेटवर्क स्वच्छ करणे आणि प्रत्यक्ष कामास आणखी पाच दिवस लागू शकतात. देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयावरील या हल्ल्यामागे आंतरराषट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
AIIMS ने एका निवेदनात म्हटले आहे की, एम्समध्ये काम करणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (NIC) टीमने माहिती दिली की, हा रॅन्समवेअर हल्ला असू शकतो. योग्य कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी चौकशी करतील. डिजिटल सेवा पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि NIC ची मदत घेतली जात आहे. त्याचबरोबर भविष्यात असे हल्ले होऊ नयेत यासाठी एम्स आणि एनआयसी योग्य ती खबरदारी घेतील.