धक्कादायक तरूण क्रिकेटपटूने केली आत्महत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 16, 2020 | 14:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mohammad Sozib: बांगलादेशचा युवा क्रिकेटपटू मोहम्मद सोजिब याने आपल्या घरी आत्महत्या केली आहे. सोजिबची आगामी बंगबंधू टी-20 चषकासाठी निवड झाली नव्हती. २०१८मध्ये तो अंडर-१९ विश्वचषकासाठी स्टँडबाय होता.

Mohammad Sozib
क्रिकेटमध्ये दिसत होते भविष्य, पण प्रतिभावंत युवा क्रिकेटपटूने अचानक केली आत्महत्या 

थोडं पण कामाचं

  • मोहम्मद सोजिबची आगामी बंगबंधू टी-20 कपसाठी नाही झाली निवड
  • गेल्या काही वर्षांमध्ये नियमितपणे क्रिकेट खेळत नव्हता सोजिब
  • सोजिबने दोनच दिवसांपूर्वी राजशाहीमध्ये खेळला होता सामना

ढाका: बांगलादेशचा (Bangladesh) तो अंडर-१९ क्रिकेट संघाचा (under-19 cricket team) माजी खेळाडू (former player) मोहम्मद सोजिब (Mohammad Sojib) याने शनिवारी आपल्या घरी आत्महत्या (committed suicide) केली. राजशाहीचा (Rajshahi) २१ वर्षीय सोजिब हा सैफ हसनच्या (Saif Hassan) नेतृत्वातील (captaincy) बांगलादेशच्या अंडर-१९ संघाचा सदस्य होता. तो स्टँडबाय खेळाडू (standby player) म्हणून न्यूझिलंडला (New Zealand) गेला होता, पण त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली (no chance in Playing 11) नाही. या डावखुऱ्या फलंदाजाला (lefty batsman) याआधी बांगलादेशच्या अंडर-१९च्या आशिया चषकासाठीच्या (Asia Cup) मालिकेत स्थान मिळाले होते.

बीसीबीच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केले दुःख

२०१८मध्ये सोजिबने शिनेकुपुरसाठी ए यादीत पदार्पण केले होते आणि ९, ० आणि १ अशा धावा केल्या होत्या. पण मार्च २०१८नंतर त्याने एकही स्पर्धात्मक सामना खेळला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) खेळ विकास व्यवस्थापक अबू एनाम मोहम्मद यांनी याबाबत दुःख प्रदर्शित केले. सोजिब आगामी बंगबंधू टी-20 कपच्या ड्राफ्टमध्ये सामील नव्हता. अबू यांचे म्हणणे आहे की मालिकेच्या बाहेर करण्यात आल्यामुळे कदाचित सोजिबने हे पाऊल उचलले.

गेल्या काही वर्षांपासून सोजिब नियमितपणे खेळत नव्हता

अबू यांनी बीडी क्रिकटाईमशी बोलताना सांगितले, ‘सोजिब हा २०१८ बॅचमध्ये अंडर-१९ संघात होता. त्याच्यासोबत सैफ आणि अफीफ हुसैन हेही होते. तो विश्वचषकात स्टँडबाय खेळाडू होता. आशिया चषकात तो श्रीलंकेच्या विरोधात खेळला होता. त्याच्या आत्महत्येची बातमी ऐकून फार वाईट वाटले. त्याने नैराश्यातून असे टोकाचे पाऊल उचलले की इतर काही कारण होते हे सांगणे कठीण आहे. गेल्या काही वर्षांपासून तो नियमितपणे क्रिकेट खेळत नव्हता.’ ते पुढे म्हणाले, ‘सोजिब राजशाहीसाठी खूप समर्पित खेळाडू होता. त्याने ढाकामध्ये फर्स्ट डिव्हिजन आणि ढाका प्रिमियर लीगमध्येही भाग घेतला होता. तो आगामी बंगबंधू टी-20 ड्राफ्टमध्ये नव्हता. तो निराश होता का याबद्दल मला माहिती नाही. त्याने दोन दिवस आधीच राजशाहीमध्ये सामना खेळला होता.’

बांगलादेश क्रिकेटविश्वाने व्यक्त केले दुःख

बीसीबी निदेशक खालीद महमूद यांनी सोजिबला प्रतिभावान खेळाडू म्हटले. महमूद म्हणाले, ‘मी जे ऐकले त्यावर माझा विश्वास बसत नाही. मला याबद्दल खूप वाईट वाटत आहे. तो सलामीचा खेळाडू होता, मध्यमगती गोलंदाज होता आणि शिनेपुकुर क्लबसाठी तो खेळत असे.’ बांगलादेशच्या प्रथम श्रेणीचा क्रिकेटर तन्मय घोषने म्हटले की सोजिब खूप प्रतिभावंत फलंदाज होता आणि बराच काळ खेळण्याची क्षमता त्याच्याकडे होते. बांगलादेशमध्ये मानसिक आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारची सेवा उपलब्ध नाही. फक्त बीसीबीच वेळोवेळी मानसिक आरोग्य विशेषज्ञांसह येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी