MP Harbhajan Singh : खासदार होताच हरभजन सिंगची कमाल; शेतकऱ्यांच्या मुलींसाठी घेतला मोठा निर्णय, सर्वजण करताय कौतुक

भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाचा माजी खेळाडू (Former Player) हरभजन सिंग (Harbhajan Singh) त्याच्या कारकिर्दीत खूप चर्चेत होता. क्रिकेटमधून (Cricket) संन्यास घेतल्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतो.

Harbhajan Singh's Big decision taken for farmers daughters
खासदार होताच हरभजन सिंगचं मोठं काम, सर्वजण करताय कौतुक   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • हरभज सिंगने घेतलेल्या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांचा मुलींना होणार.
  • हरभजनने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
  • हरभजन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्तीय

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाचा माजी खेळाडू (Former Player) हरभजन सिंग (Harbhajan Singh) त्याच्या कारकिर्दीत खूप चर्चेत होता. क्रिकेटमधून (Cricket) संन्यास घेतल्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतो. अलीकडेच हरभजनला पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) राज्यसभेची खासदारकी मिळाली. खासदारी (MP) मिळताच हरभजन सिंगने आपली कमाल दाखवली असून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णयय घेतला आहे. त्यांनी सुरू केलेल्या नवीन उपक्रमाचं सर्वत्र खूप कौतुक होत आहे. ट्विटरच्या माध्यमातून हरभजन सिंगने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. 

हरभज सिंगने घेतलेल्या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांचा मुलींना होणार आहे. शेतक-यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आपला पगार देणार असल्याचं हरभजननं ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिले, "राज्यसभा सदस्य म्हणून मला माझा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी द्यायचा आहे. मला माझ्या देशासाठी योगदान द्यायचे आहे आणि मी जे काही करू शकतो ते करेन''.

विशेष म्हणजे, हरभजनने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर तो नवज्योत सिंग सिद्धूसोबत अनेकवेळा दिसला. यावरुन हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करेल अशी  अपेक्षा अनेकांना होती. परंतु असं झालं नाही. हरभजन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्तीय असून त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आणि खासदारकी मिळवली.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी