Fuel Prices | पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा महाविकास आघाडीला इंधन दरावरून सवाल

Tax on fuel : इंधन दरावरून (Fuel Price) केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri)यांनी आकडेवारी देत महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government)कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. ंधन दरवाढ कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्हॅट कमी करावा. राज्य सरकार यातून चांगलाच कर गोळा करते आहे, अशा आशयाचे ट्विट करत पुरी यांनी आकडेवारी दिली आहे.

Hardeep Singh Puri on fuel price
इंधन करावरून हरदीप सिंग पुरी 
थोडं पण कामाचं
  • इंधन दरवाढीवरून केंद्र आणि राज्यात जुंपली
  • पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे महाराष्ट्र सरकारला सवाल करणारे ट्विट
  • इंधन दरवाढीवरून वाद

Hardeep Singh Puri tweet : नवी दिल्ली : इंधन दरावरून (Fuel Price) केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri)यांनी आकडेवारी देत महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government)कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. इंधन दरवाढ कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्हॅट कमी करावा. राज्य सरकार यातून चांगलाच कर गोळा करते आहे, अशा आशयाचे ट्विट करत पुरी यांनी आकडेवारी दिली आहे. (Hardeep Singh Puri ask Maharashtra government to reduce Vat on fuel)

अधिक वाचा : Corona Alert Mask Alert : कोणकोणत्या राज्यांमध्ये कोरोनामुळे मास्कसक्ती लागू?

हरदीप सिंग पुरी यांचे ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवताच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्ला करणारे ट्विट केले आहे. ते म्हणतात, 'सत्य दुखावते, परंतु खरी माहिती स्वतःविषयी बोलते. महाराष्ट्र सरकारने 2018 पासून इंधन कर म्हणून 79,412 कोटी रुपये जमा केले आहेत आणि यावर्षी 33,000 कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. (एकूण रक्कम 1,12,757 कोटी रुपयांपर्यंत होते) लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट महाराष्ट्र सरकारने का कमी केला नाही?' असा सवाल आपल्या ट्विटमध्ये हरदीप सिंग पुरी यांनी केला आहे.

अधिक वाचा : CBSE Fake Notice : सीबीएसई टर्म टू परीक्षेबाबतची फेक नोटीस होत आहे 'सर्क्युलेट', बोर्डाने दिला 'अलर्ट'

केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार

इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. इंधनाचे दर कमी करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर हल्ला चढवत आहेत. केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करावेत असे राज्य सरकारांना वाटते तर राज्य सरकारांनी कर कमी करून जनतेला दिलासा द्यावे अशी केंद्राची भूमिका आहे. पंतप्रधानांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत राज्य सरकारांनी विशेषत: बिगर भाजपशासित राज्यांनी इंधनावरील व्हॅट कर कमी करत इंधनाचे दर कमी करावेत असे म्हटले होते. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर हल्ला चढवला होता.

अधिक वाचा : जम्मू काश्मीरमध्ये ६२ दहशतवादी ठार

देशात वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशातील राज्याचे सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. परंतु या आढावा बैठकीत कोरोना (Corona) ऐवजी पेट्रोल-डिझेलनं (Petrol-diesel) भडका घेतला. पंतप्रधानांनी खडेबोल सुनावल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पंतप्रधान मोदींना उत्तर दिलं जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर कालच्या बैठकीवरुन टीका केली आहे. 

आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, कालच्या बैठकीवर मी बोलणं योग्य नाही. कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या. पंतप्रधानांनी एकतर्फी संवाद साधला. बिगरभाजप शासित राज्यांचं म्हणणं आहे की, पंतप्रधानांचं वागणं त्यांच्यासाठी वेगळ आणि भाजपशासित राज्यांसाठी वेगळं होतं. बिगर भाजपशासित राज्यांना टोमणे मारण्याचं जास्त काम झालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी