Hardik Patel Will Join BJP: ज्यांनी लावली 'ती' वाली सीडी; हार्दिक पटेलची त्याच पक्षात उडी, या दिवशी भाजपात घेणार प्रवेश

गुजरात (Gujarat) मधील पाटीदार समाजाचे (Patidar community) युवा नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) भाजपमध्ये (BJP) प्रवेश अखेर ठरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या कौतुकात गुंग झालेले हार्दिक पटेल काँग्रेसचा हात सोडत कमळ हातात घेणार आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल 2 जूनला भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

After being praised, now Hardik Patel will join BJP
कौतुक केल्यानंतर आता हार्दिक पटेल करणार भाजपात प्रवेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काही दिवसांपासून गुजरात काँग्रेस आणि हायकमांडवर हार्दिक नाराज होता.
  • पक्षाचे राजकारण केवळ निषेधापुरतेच मर्यादित राहिले आहे. - हार्दिक पटेल
  • देशाला आंदोलनाची गरज नाही, तर त्यांच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पर्यायाची गरज

Hardik Patel BJP: गुजरात (Gujarat) मधील पाटीदार समाजाचे (Patidar community) युवा नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) भाजपमध्ये (BJP) प्रवेश अखेर ठरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या कौतुकात गुंग झालेले हार्दिक पटेल काँग्रेसचा हात सोडत कमळ हातात घेणार आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल 2 जूनला भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

 दरम्यान राजकारणात सक्रिय होताना भाजप विरोधात हार्दिक पटेलने आवाज उठवला होता.  विधानसेभेच्या निवडणुकावेळी हार्दिकने काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजप समोर मोठं आव्हान उभं केलं होतं. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं हार्दिकची एक सीडी प्रदर्शित केली होती. त्यावरुन मोठ राजकारण तापलं होतं. परंतु आता तोच हार्दिक त्याच भाजपचं कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गुजरात काँग्रेस आणि हायकमांडवर हार्दिक नाराज होता. पटेल याने अलीकडेच काँग्रेस सोडला आहे. यावेळी एक पत्र लिहून त्याने काँग्रेसवर निशाणा साधला. 

काँग्रेस फक्त निषेध-विरोध करणारा पक्ष

हार्दिक पटेल यांनी लिहिले की, पक्षाचे राजकारण केवळ निषेधापुरतेच मर्यादित राहिले आहे. हार्दिकने आपल्या पत्रात CAA-NRC आणि कलम 370 चाही उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले होते की, देशाला आंदोलनाची गरज नाही, तर त्यांच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पर्यायाची गरज आहे. अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असो किंवा जीएसटीची अंमलबजावणी असो. देशाला दीर्घकाळापासून त्यांच्यावर तोडगा हवा होता आणि काँग्रेस पक्ष त्यात अडसर ठरत राहिला.

हार्दिकच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का

राजीनामा देण्यापूर्वी हार्दिक पटेलने आपल्या ट्विटर हँडलवरून पक्षाचे नाव आणि पद काढून टाकले होते. यानंतर ते लवकरच पक्ष सोडण्याची घोषणा करतील अशी अटकळ जोर धरू लागली होती. दरम्यान अनेकांचा ही अंदाज खरा ठरत हार्दिकने काँग्रेस सोडली आणि आता विरोधी पक्ष वाटत असलेला भाजप पाटीदार नेत्याला जवळचा वाटू लागला आहे. दरम्यान गुजरातमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

पाटीदार आंदोलनाचा काँग्रेसला फायदा  

2017 मध्ये पाटीदारांसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी पटेलांच्या आंदोलनाचा काँग्रेसला फायदा झाला होता, परंतु 2019 मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाल्यापासून पक्षाला असलेला समुदायाचा पाठिंबा कमी झाला आहे.  2017 मध्ये फक्त 9 जागा कमी आल्यानं गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली. सत्ता स्थापन करण्यासाठी 182 सदस्यांची गरज एका पक्षाला असते. दरम्यान तेव्हा असं वाटत होतं की, दोन दशकांहून अधिक काळ राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मात्र आता हार्दिकच्या जाण्याने काँग्रेससाठी ही स्पर्धा कठीण झाली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी