Namaj at home 'खुल्या जागेत नाही घरात नमाज अदा करा'

Haryana CM Manohar Lal Khattar's big statement, read Namaj at home not in the open खुल्या जागेत नाही घरात नमाज अदा करा; असे वक्तव्य हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केले.

Haryana CM Manohar Lal Khattar's big statement, read Namaj at home not in the open
Namaj at home 'खुल्या जागेत नाही घरात नमाज अदा करा'  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • Namaj at home 'खुल्या जागेत नाही घरात नमाज अदा करा' - खट्टर
  • खुल्या जागेवर नमाज अदा करुन तणाव निर्माण करणे टाळा - खट्टर
  • वक्फ बोर्डाकडे भरपूर जमीन आहे, या जमिनीवर नमाज अदा करायला हरकत नाही - खट्टर

Haryana CM Manohar Lal Khattar's big statement, read Namaj at home not in the open चंदिगड: खुल्या जागेत नाही घरात नमाज अदा करा; असे वक्तव्य हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केले. गुरुग्राम येथे मागील अनेक महिन्यांपासून खुल्या जागेत नमाज अदा करण्याला विरोध होत आहे. आज स्थानिकांनी विरोधाची धार आणखी तीव्र केली. यानंतर हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी नमाज अदा करण्यावरुन महत्त्वाचे वक्तव्य केले.

गुरुग्राम येथे खुल्या जागेत नमाज अदा करण्याची प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हे योग्य नाही आणि स्थानिकांना अमान्य आहे. परस्पर चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक आहे. वक्फ बोर्डाकडे भरपूर जमीन आहे. या जमिनीवर नमाज अदा करायला हरकत नाही. पण खुल्या जागेत नमाज अदा करणे आवश्यक नाही. खुल्या जागेऐवजी आपापल्या घरात नमाज अदा करा; असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले.

खुल्या जागेवर नमाज अदा करुन तणाव निर्माण करणे टाळा; असे आवाहन हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत तणाव निर्माण होऊ दिला जाणार नाही. चर्चेतून मार्ग काढता येईल. पण इतरांची गैरसोय करुन चालणार नाही. व्यापक विचार व्हायला हवा; असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी