Crime against women: पतीच्या मानेवर चाकू ठेवून पत्नीवर गँगरेप

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 02, 2019 | 17:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Crime against women In India: अंधाराचा फायदा घेत महिलेवर गँगरेप झाल्याची घटना घडली आहे. पतीच्या मानेवर चाकू ठेवून आरोपीनं हे वाईट कृत्य केलं .यातील एक नराधम पोलिसांच्या ताब्यात असून अन्य २ आरोपींचा शोध सुरू आहे

Representational Image
धक्कादायक, पतीसमोरच भररस्त्यात पत्नीवर गँगरेप  |  फोटो सौजन्य: Getty Images

Gangrape Crime against women: हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एका महिलेवर गँगरेप झाल्याच्या घटनेनं सगळीकडे खळबळ माजली आहे. रोहतकजवळच्या हसनगढजवळ तीन नराधमांनी अंधाराचा फायदा घेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे नराधम एवढंच करून थांबले नाही तर महिलेच्या पतीला मारहाण करत त्याला लुटलं. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून सध्या पोलीस चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सागर नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सध्या आरोपी सागर याची कसून चौकशी केली जात आहे. 

रिपोर्ट्सनुसार, पीडित महिलेच्या पतीनं दिलेल्या बाईकच्या (Registration Number) नंबरच्या आधारावर पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी सागरला पोलिसांनी त्याचं गाव नायबास राजस्थानमधून अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पती पत्नी बाईकवरून जात होते तेव्हा तीन नराधमांनी महामार्गावर त्यांना रोखलं. तिघे ही बुलेटवरून जात होते आणि त्यांनी महिला आणि तिच्या पतीला भररस्त्यात थांबवलं. ही घटना ८ च्या सुमारास घडली. या प्रकरणी तक्रार महिलेच्या पतीनं रोहतकच्या सांपला पोलीस स्टेशनमध्ये केली. या तक्रारीत पतीनं म्हटलं की, हे जोडपं सोनीपत जिल्ह्यातले रहिवाशी आहेत. मी आपल्या पत्नीसोबत घरी जात असताना ही घटना घडली. 

पतीनं तक्रारीत म्हटलं की, एका नराधमानं माझ्या मानेवर चाकू ठेवला आणि अन्य दोन लोकांनी माझ्या पत्नीला काही अंतरावर घेऊन गेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीतर  त्यांनी माझ्याकडचे सात हजार रूपये रक्कम आणि मोबाईल देखील घेतला. 

सांपलाचे एसएचओ( SHO) कुलदीप सिंह यांनी सांगितले की, आम्ही तीन व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली आहे. एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे. अन्य दोन आरोपींना देखील आम्ही लवकरच अटक करू. त्यासोबतच पोलिसांनी सांगितलं की, पीडित महिलेची मेडिकल चौकशी करण्यात आली आहे. 

भारतात महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना आता दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारत सध्या महिलांसाठी असुरक्षित देश ठरतोय. २०१८ मध्ये थॉम्सन रॉयटर्स  फाऊंडेशन या संस्थेनं महिलांवर होणारे अत्याचार यावर सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणानुसार भारतात महिलांवर जास्त लैगिंक अत्याचार होत असल्याचं समोर आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी