Haunted Story of Baker Hotel: आपले जग हे गोल आहे, त्यामुळे इथे काही ना काही एकमेकांशी जोडले गेले आहे. मग ती श्रद्धा असो वा अंधश्रद्धा असो, त्यांचा एकमेकांशी संबंध येतोच! आज आम्ही जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत ती याच श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर आधारित आहे. चला तर मग या थक्क करून टाकणाऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेऊ. (haunted story of the magical water at the Baker Hotel in usa )
टेक्सास (यूएसए) मधील बेकर हॉटेल नावाच्या हॉटेलबद्दल आपण चर्चा करत आहोत. असे म्हंटले जाते की, या हॉटेलमध्ये लोकं जादुई पाण्याच्या शोधात येत असे, पण त्याच्या नादामध्ये ते मृत्यूमुखी पडत असे. हे झपाटलेले हॉटेल जवळपास 100 वर्षे जुने आहे.
अधिक वाचा : आंबेडकर जयंतीला हे भाषण देऊन जिंकाल मन
1929 मध्ये सुरू झालेल्या या हॉटेलच्या उभारणीसाठी सुमारे 9 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आता तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की हे हॉटेल किती आलीशान असेल. 14 मजली या हॉटेलमध्ये 450 खोल्या आहेत, ज्यात स्पा आणि स्विमिंग पूल देखील आहे. असे असले तरी, या हॉटेलच्या बाजूने जाण्यास ही लोकं घाबरतात.
असे म्हंटले जाते की, या हॉटेलमध्ये आलेली एक मानसिक आजारी महिला 'जादूई पाणी' प्यायल्यानंतर पूर्णपणे बरी झाली होती, पुढे या पाण्याला 'मिनरल रिच वॉटर' असेही म्हटले गेले. ही महिला बरी झाल्यानंतर हे हॉटेल चांगलेच प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी, म्हणजे 1931 मध्ये, शेअर बाजार कोसळला, ज्यामुळे हॉटेल चालवणे खूपच कठीण झाले, त्यामुळे हॉटेलची मालकी दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यात आली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काहरामुळे हे हॉटेल बंद करावे लागले होते. पण, 'जादुई पाणी' साठी इथे लोक श्रद्धेने येत राहिले, मात्र पाणी काही मिळाले नाही. मात्र, लोकं आजारी नक्की पडली, त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने ती दगावू लागली. असे मानले जाते की, मृत्युमुखी पडलेल्या या लोकांचे आत्मे आजही येथे फिरतात आणि तिथे येणाऱ्या लोकांनाही खूप त्रास देतात. काही वेळा येथे येणाऱ्या लोकांच्या अंगावर ओरखडे किंवा चावण्याचा खुणा देखील आढळून आल्या आहेत.
सोशल मिडियावर या हॉटेलचा जुना फोटो शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल, हे हॉटेल नसून एक झपाटलेला भूत बंगला आहे असे वाटून जाईल. कारण या फोटोंमधील दृश्य इतके भयानक आहेत, की इथे जादुई पाण्याच्या शोधात येणारी माणसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे इथे येण्यास इच्छुक असणारी लोक आता इथे येऊ इच्छुक नाही.