Maharashtra News: महाराष्ट्र आणि कर्नाटक (Maharashtra and Karnataka)राज्यातील सीमा वादावरुन (Border Dispute) दोन्ही राज्यातील राजकीय (political) वातावरण तापलं होतं. परंतु केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister)अमित शहा (Amit Shah) यांनी दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतल्यानंतर हे प्रकरण थोडं शांत झालं आहे. या दरम्यान सर्वांच्या नजरेस एक बाब आली ती म्हणजे सीमेवरील लोकांना सुविधा मिळत नसल्याने त्यांना दुसऱ्या राज्यात जायचं आहे. सुविधा मिळत नसल्याची ओरड या भागातील लोकांनी केलीय. अशात एक बाब समोर आली आहे, ज्या कहाणी ऐकून तुम्ही अवाक व्हाल. महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या महाराजगुड़ा येथील एक घर दोन राज्यात विस्तारलं आहे. विशेष म्हणजे घरमालक या गोष्टीने खूश आहेत.
या घराचे मालक आहेत, उत्तम पवार आहेत. हे महाराजगुड़ा येथील रहिवासी आहेत. त्यांचे घर हे दोन राज्याच्या सीमेवर आहे. घराच्या चार खोल्या महाराष्ट्रात आहेत तर दुसऱ्या चार खोल्या ह्या तेलंगणा राज्यात आहेत. सध्या सोशल मीडियावर पवार तात्यांच्या घराची मोठी चर्चा आहे.
राज्याच्या सीमेवरील गावांना आणि तेथील नागरिकांना योग्य सुविधा मिळत नाहीत, अशी ओरड तेथील रहिवाशी करतात. परंतु दोन राज्यांमध्ये घर असलेल्या उत्तम पवार यांना अडचण नाही कारण त्यांना दोन्ही राज्यांमध्ये सुविधा मिळत आहेत. ते दोन्ही राज्यातील सुविधांचा लाभ घेत आहेत. घराविषयी बोलताना मालक उत्तम पवार म्हणाले की, त्यांच्या घरात आठ खोल्या आहेत, त्यापैकी चार तेलंगणात आहेत तर उर्वरित महाराष्ट्रात आहेत. या घराचे वर्णन करताना पवार म्हणतात, 'आमच्यापैकी जवळपास 12-13 लोक या घरात राहतात. आमचे स्वयंपाकघर तेलंगणात आहे आणि बैठक हॉल हा महाराष्ट्रात आहे.
पवार म्हणतात, “1969 मध्ये जेव्हा सीमा सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की आमचे अर्धे घर महाराष्ट्रात आहे तर अर्धे घर तेलंगणात आहे.” परंतु आम्हाला याची काही त्रास नाही.आम्ही दोन्ही राज्यातील ग्रामपंचायचा कर भरतोय. परंतु तेलगंणा राज्यातील सरकारी योजनांचा अधिक लाभ घेत आहोत.
असेच एक घर नागालँडच्या मोन जिल्ह्यातील लोंगवा गावात आहे जिथे एका गावचे प्रमुख आंगचे घर अर्धे भारतात आहे तर दुसरे अर्धे घर हे म्यानमारमध्ये आहे, जे आंतरराष्ट्रीय सीमेवरून जाते. लोंगवा येथील ग्रामस्थ दुहेरी नागरिकत्व धारण करतात आणि ते दोन्ही देशांमध्ये मुक्तपणे फिरू शकतात. नेदरलँड आणि बेल्जियमच्या सीमेवर अशी घरे आहेत जे बेल्जियम आणि नेदरलँडच्या सीमेवर बनलेले आहे.