Odisha : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांचे निधन झाले आहे. रविवारी दुपारी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर नाबा दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. नब दास यांच्या छातीवर गोळी लागली होती. (Health Minister Naba Das shot dead)
अधिक वाचा : u19 Womens T20 World Cup : इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत भारताने जिंकला विश्वचषक
SDPO च्या माहितीनुसार, झारसुगुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगरजवळ नबा दास गाडीतून खाली उतरल्यावर एएसआयने समोरून अनेक राऊंड फायर केले. दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली जेव्हा दास एका बैठकीला जात होते. मंत्री दास यांना प्रथम झारसुगुडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु नंतर त्यांना चांगल्या उपचारांसाठी भुवनेश्वर येथील रुग्णालयात विमानाने नेण्याची व्यवस्था करण्यात आली. दास यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण होते. मंत्र्यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुरक्षेतील त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अधिक वाचा : Satyajeet Tambe यांना मदत करण्याचा Bjp कार्यकर्त्यांचा निर्णय, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले
दास यांना लक्ष्य करण्याचा कट असल्याचा आरोप काही समर्थकांनी केला. एसडीपीओने सांगितले की, आरोपी एएसआयला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. घटनेची सखोल चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल. आरोग्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दास यांच्या भेटण्यासाठी ते भुवनेश्वरमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.