Indian Tourist Died in Portugal : पोर्तुगलमध्ये गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यू, टीका जिव्हारी लागल्यानंतर आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

पोर्तुगालची (Portugal) राजधानी (capital ) लिस्बन (Lisbon) येथे मंगळवारी एका ३४ वर्षीय गर्भवती (pregnant) भारतीय महिला (Indian women) पर्यटकाचा (tourist) हृदयविकाराच्या(heart Attack) झटक्याने मृत्यू झाला. भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ माजली असतानाच काही तासांनंतर पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री (Minister of Health) मार्टा टेमिडो (Marta Temido) यांनी राजीनामा (resignation) दिला.

Health Minister resigns after death of Indian woman
भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला.
  • रूग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळे महिलेला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत असताना भारतीय महिलेचा मृत्यू.

लिस्बन : पोर्तुगालची (Portugal) राजधानी (capital ) लिस्बन (Lisbon) येथे मंगळवारी एका ३४ वर्षीय गर्भवती (pregnant) भारतीय महिला (Indian women) पर्यटकाचा (tourist) हृदयविकाराच्या(heart Attack) झटक्याने मृत्यू झाला. भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ माजली असतानाच काही तासांनंतर पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री (Minister of Health) मार्टा टेमिडो (Marta Temido) यांनी राजीनामा (resignation) दिला. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी (Prime Minister) त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. कोरोना काळात टेमिडा यांनी केलेल्या कामाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं होतं.  (Health Minister Resigns After Pregnant Indian Woman's Death In Portugal)

रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळे महिलेला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत असताना तिला जीव गमवावा लागला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पोर्तुगीज वृत्तपत्र डी नोटिसियासच्या मते, टेमिडो यांच्यावर टीका केली जात होती. टेमिडो यांच्यावर रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता, आपत्कालीन कार सेवा बंद करणे आणि गर्भवती महिलांसाठी योग्य आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे तीव्र टीका होत होती. या कारणास्तव त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

Read Also : गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार; आज होणार लाँच

पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी ट्विटरवर लिहिले की, टेमिडोने जे काही केले त्याबद्दल ते 'आभारी' आहेत, विशेषत: कोरोनाच्या काळात. कोस्टा यांनी आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी सुधारणा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय महिला 31 आठवड्यांची गर्भवती होती आणि तिला देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या सांता मारिया रुग्णालयात नेण्यात आले. महिलेने श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती.

मृत महिलेने दिला बाळाला जन्म 

भारतीय गर्भवती महिला पोर्तुगलमध्ये फिरण्यासाठी आली होती. महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. मात्र देशातील या सर्वात मोठ्या रुग्णालयातील प्रसूती कक्षात तिला जागा मिळाली नाही. यामुळे, तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यात सांगण्यात आलं. महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असताना, तिला ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर या महिलेचा मृत्यू झाला. महिलेने बाळाला जन्म दिला आहे. 

Read Also : डोळे मोठे करणाऱ्या विराट सूर्यासमोर नतमस्तक

वृत्तानुसार, महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्णालयाने तिला साओ फ्रान्सिस्को जेवियर रुग्णालयात हलवले कारण सांता मारिया रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. रुग्णालयात नेत असताना महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये महिलेला शस्त्रक्रियेद्वारे उपचार देण्यात आले आणि नवजात शिशुला केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले तर तिची आई आधीच मरण पावली होती. बीबीसीच्या वृत्तानुसार, महिलेच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू झाला आहे. 

लोकप्रियतेपासून टीकेपर्यंत

रॉयटर्सच्या बातमीनुसार, टेमिडो 2018 मध्ये देशाचे आरोग्य मंत्री बनल्या आणि कोविड प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या. ती तिच्या सरकारमधील सर्वात लोकप्रिय सदस्यांपैकी एक होती, परंतु अलीकडील टीकेमुळे तिच्यावर दबाव आला. उन्हाळ्याच्या सुटीत नियोजनाअभावी ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप टीकाकारांनी केला. टेमिडोच्या टीकाकारांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देखील होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी