गुजरातमध्ये पावसाचा कहर: नर्मदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, १००० लोकांचं स्थलांतर

मुसळधार पावसामुळे गुजरातला फटका बसला आहे. नर्मदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून १००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

Narmada river
गुजरातमध्ये पावसाचा कहर: नर्मदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, १००० लोकांचं स्थलांतर  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  •  मुसळधार पावसामुळे देशातल्या काही राज्यामधलं जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे.
  • गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.
  • जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे सरदार सरोवर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

अहमदाबादः  मुसळधार पावसामुळे देशातल्या काही राज्यामधलं जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. त्यातच गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे सरदार सरोवर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे आणि नर्मदा नदीच्या पाण्याची पातळी ३१ फूटापर्यंत गेली असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. भरूच जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर राहणाऱ्या एक हजारहून अधिक लोकांना मंगळवारी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

भरूचचे जिल्हाधिकारी एमडी मोदिया यांनी सांगितलं की, अंकलेश्वरहून भरूचला जोडणारा गोल्डन पुलाजवळ असलेल्या नदीचं पाणी ३१ फुटापर्यंत वाढलं आहे. २८ फूट असलेली धोक्याची पातळी ओलांडत नदीचं पाणी आणखी ३ फूट वाढलं आहे. मोदिया यांनी सांगितलं की,  नर्मदा जिल्ह्यातील केवडियामध्ये सरदार सरोवर धरणातून पाणी सोडल्यानं नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यांनी सांगितलं की, भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर आणि झगडिया तालुक्यात सखल भागातल्या एक हजाराहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, पुराच्या पाण्यामुळे जवळपास २२ गावं प्रभावित झाले आहेत.

सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेड ( SSNNL) च्या कंट्रोल रूममधून दिलेल्या माहितीनुसार, मेगा डॅमच्या ३० दरवाजांपैकी २३ दरवाजे उघडण्यात आले असून ६.४२ लाख क्युसेक पाण्याची विसर्ग होतं आहे. धरणातला पाणीसाठा १३६.५० मीटर होता. जे सर्वोच्च १३८ मीटरपेक्षा फक्त १.५० मीटर कमी आहे.

गुजरातमध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या एका माहितीत सांगण्यात आलं आहे की, मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून ४ वाजेदरम्यान नवसारी जिल्ह्यातील गांडेवी तालुक्यात ११४ मिमी पाऊस झाला. सुरतच्या चौरासीमध्ये (९४ मिमी), गिर-सोमनाथच्या सुतपाडा (९३ मिमी), नवसारीच्या जलालपोर (८६ मिमी), अहमदाबाद शहर (८५ मिमी), नवसारी तालुका (८३ मिमी) आणि सुरतच्या महुवा (७७ मिमी) पाऊस झाला. मंगळवारी सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारताच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...